Vasco School Ceiling Collpased Dainik Gomantak
गोवा

Vasco School Ceiling Collpased: वास्कोमध्ये शाळेचे छत कोसळले; विद्यार्थी-शिक्षकांमध्ये घबराट

दुर्घटनेनंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना घरी पाठवत शाळा केली रिकामी

Akshay Nirmale

Vasco School Ceiling Collpased: दक्षिण गोव्यातील वास्को येथील एका शाळेच्या छताचा भाग शनिवारी अचानक कोसळला. अचानक घडलेल्या या प्रकाराने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये घबराट निर्माण झाली.

या घटनेनंतर शाळा प्रशासनाने शाळेतील सर्व वर्ग सोडण्याचा निर्णय घेत, सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवून शाळा रिकामी केली. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.

गेल्या काही दिवसांपासून गोव्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातूनही ही घटना घडली असण्याची शक्यता आहे. ही शाळा सरकारी असून जुनी आहे. तिचे बांधकाम थोडे कमकुवत झाल्याची शक्यता आहे.

भविष्यात ही इमारत कोसळू नये म्हणून या इमारतीची आत्ताच दुरूस्ती करणे गरजेचे आहे. या घटनेनंतर परिसरातील पालकांनाही मुलांना या शाळेत पाठवण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे तातडीने याबाबत शाळा प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT