Valpoi News
Valpoi News Dainik Gomantak
गोवा

Valpoi News: शाळा ही मुलांच्या संस्काराची शिदोरी

गोमन्तक डिजिटल टीम

मुलांच्या शिक्षणाचा पाया हा शाळांतून होत असतो. शाळा ही मुलांच्या संस्काराची शिदोरी आहे. त्यातून मिळालेल्या ज्ञानावर पुढील आयुष्य अवलंबून असते.

आज शिक्षण क्षेत्रात अनेक संधी व सुविधा आहेत त्याचा फायदा गरजूंनी करून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन पर्ये मतदारसंघाच्या आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी केले.

सरकारी माध्यमिक विद्यालय मोर्ले सत्तरीच्या बक्षीस वितरण आणि स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्‍या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी सुखठणकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष विनायक गावस, सन्माननीय अतिथी मोर्लेचे सरपंच अमित शिरोडकर, खास निमंत्रित जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, मोर्लेच्या उपसरपंच रुचिता माईणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

सरपंच अमित शिरोडकर म्हणाले, आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या मदतीने पर्ये मतदारसंघाचा विकास झपाट्याने होत आहे. अल्पावधीतच त्यांनी जनतेच्या मनात घर केले आहे. त्याचबरोबर सत्तरीच्या गरजू मुलांना शिक्षणासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या सहकार्याने मदत मिळत आहे. यावेळी विनायक गावस व देवयानी गावस यांची समायोचित भाषणे झाली.

लक्ष्मी सुखठणकर यांनी प्रस्तावना आणि पाहुण्यांचे स्वागत केले. मनीषा दळवी यांनी पाहुण्यांची ओळख करून त्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. शिक्षिका संज्योती पावसकर यांनी अहवाल वाचन केले. वैष्णवी गावकर यांनी बक्षीस वितरण केले. रंजना कोदाळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयकृष्ण वेळुसकर यांनी केले. त्यानंतर मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Extortion Case: खंडणीसाठी वास्कोच्या व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

Goa Human Trafficking: गोव्यात कशी होते मानवी तस्करी, कोणती आमिष दिली जातात? डिजीपींनी दिली माहिती

Panaji PS Attack Case: पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणाची 17 जूनला सुनावणी

Goa Politics: लोकांचा भाजपविरोधातील राग व्यक्त, दोन्ही जागा जिंकण्याचा इंडिया आघाडी दावा

Yellow Alert In Goa: गोव्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता, दोन दिवसांसाठी 'यलो अलर्ट'

SCROLL FOR NEXT