Goa Teacher Beats Student Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: डिचोलीत शाळकरी मुलाला मारहाण! शिक्षिकेवर गुन्हा दाखल

शिक्षिकेचे मात्र कानावर हात

Kavya Powar

School boy beaten in bicholim; case has been filed against the teacher

डिचोलीतील एका प्राथमिक शाळेत एका शिक्षिकेकडून कोवळ्या मुलाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित मुलाच्या आईने डिचोली पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर संशयित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

पटसंखेच्या बाबतीत संपूर्ण राज्यात आघाडीवर असलेल्या आणि ‘ग्रीन शाळा’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या कारापूर पंचायत क्षेत्रातील एका शाळेत हा प्रकार घडला. ज्या शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंद झाला आहे, ती पॅरा शिक्षिका असल्याची माहिती मिळाली आहे. मारहाण करण्यात आलेला मुलगा झरीवाडा-पडोसे येथील आहे.

दरम्यान, आपण मुलाला मारहाण केलेली नाही, असे संबंधित शिक्षिकेचे म्हणणे आहे. तसे तिने शाळेच्या प्रमुखांकडे स्पष्ट केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढला आहे. पोलिस चौकशीनंतरच प्रकरणामागील सत्य उघड होईल. मात्र या प्रकारामुळे सध्या खळबळ माजली आहे.

मुस्‍कटात मारल्‍यामुळे डोके आपटले भिंतीला!

शनिवारी (ता. २५) स्वच्छतागृहातून बाहेर येताना संबंधित शिक्षिकेने आपल्या मुलाच्या मुस्‍कटात लगावली. त्यामुळे त्याचे डोके भिंतीच्या कडेला आपटून डोक्याला मुका मार बसला, असा दावा मारहाण झालेल्या मुलाची आई विश्रांती गावकर हिने केला आहे.

तशी तक्रार तिने पोलिसांत केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दाखल घेत संशयित शिक्षिकेविरोधात भारतीय दंड संहितेच्‍या ३२३ आणि बालहक्क कायद्याच्या ८ (२) या कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विकेश हडफडकर पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Eng 1st T20: 'वैभव'ची एन्ट्री की संजू-इशानवरच विश्वास? इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT