बेकायदा रेती वाहतूक प्रकरणी हनुमंत जाधव (वय ३०) आणि आबिद शेख (वय ३३) (दोघेही रा. कुडाळ-महाराष्ट्र) यांना अटक करुन ट्रक जप्त करण्यात आले आहेत.
मातीच्या होणाऱ्या धूपबाबत आयआयटी- मुंबईचा अहवाल भाजप सरकारसाठी धोक्याची घंटा आहे आणि त्यामुळे त्यांनी विनाशकारी तीन रेषीय प्रकल्पांवर पुनर्विचार करावा, असे गोव्याचे विरोधी पक्षनेते (एलओपी) युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
आमदार नीलेश काब्राल यांचे मंत्रिपद काढून घेतल्यानंतर त्यांचा लोकसभा उमेदवारीसाठी चर्चा होत असताना, या चर्चा त्यांनी खोडून काढल्या आहेत. आमदार म्हणून मी खूश असून, लोकसभेत रस नाही असे त्यांनी म्हटले आहे.
गोव्यात सुरू असलेल्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सोमवारी, 27 नोव्हेंबर रोजी कला अकादमीत झालेल्या इन कॉन्व्हर्सेशन सत्रात ते बोलत होते.
या कार्यक्रमात चित्रपटांत खलनायकांच्या भूमिका साकारलेले रणजीत, रझा मुराद, किरण कुमार, गुलशन ग्रोव्हर हे सहभागी झाले होते. चित्रपट उद्योग विश्लेषक कोमल नाहटा यांनी या सर्वांशी दिलखुलास संवाद साधला.
अभिनेते रणजीत म्हणाले की, मी अलीकडच्या काळात अनेक फिल्म्स, वेबसीरीज नाकारल्या. मी एकही वेबसीरीज केलेली नाही. कारण त्यातील भाषा ही घरातल्यांसमोर बोलली जाणारी नाही. मी डायलॉग न बोलता ते एक्सप्रेशन देऊ शकतो. शिवी कशाला पाहिजे. आजकाल सगळं शिव्यांवरून सुरू होते. आजची जी भाषा आहे ती जाणीवपूर्वक बनवली जात आहे.
विहिरीत पेट्रोलियम घटक आढळून आल्यानंतर माटवे- दाबोळी येथील विहिरी बंद करण्यात आल्या आहेत. आय.ओ.सी ते झुआरी टॅन्क लाईनमध्ये गळती असल्याने विहिरी प्रदूषित झाल्या असतील, अशी शक्यता अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केली.
संयोगितागंज, इंदूर येथून वडील आणि बहिणीची हत्या करुन फरार झालेला आरोपी वीस दिवसानंतर सापडला आहे. इंदूर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी गोव्यात सर्च ऑपरेशन सुरु केले होते. पुलिन धामांडे असे संशयित आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सायको किलर क्रूझवर एन्जॉय करताना आढळला.
पुलिन 08 नोव्हेंबर रोजी वडील केके.धामंडे आणि बहीण रमा यांची हत्या करुन फरार झाला होता, तो मानसिक आजारी असल्याचे तपासातून समोर आले आहे.
म्हापसातील टॅक्सी स्टँडजवळ टाटा ट्रक आणि मारुती सुझुकी यांच्यात आज (27 नोव्हेंबर) धडक झाली. परिणामी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. उपलब्ध माहितीनुसार, मन्सूर मोबाइल एंटरप्रायझेसजवळील चौकात लाल सिग्नलच्या वेळी टाटा ट्रक (रजि. क्र. GA 07 T 0279) आणि मारुती सुझुकी XL6 (रजि. क्र. GA 03 Z 9802) यांची टक्कर झाल्याने एकच गोंधळ उडाला. कार वेगात असल्यामुळे ही धडक झाली असल्याचा आरोप ट्रक चालकाने केला आहे. सदर अपघातामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे तिथेच कदंबा बस आणि ह्युंडाई I20 यांची एकमेकांशी टक्कर झाली. त्यामुळे आधीच निर्माण झालेल्या गोंधळात आणखीच भर पडली.
मुंबई आयआयटीच्या अहवालात युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषीत केलेल्या तसेच पृथ्वी ग्रहावरील 35 जैव विविधता स्थळांपैकी एक असलेल्या 1600 किलोमीटर लांब पश्चिम घाटात मातीची धूप अती जलद गतीने होत असल्याचे नमूद केले आहे.
सदर अहवालात जवळपास 80 टक्के मातीची धूप झाली असल्याचे म्हटले आहे. विध्वंसक तीन रेखीय प्रकल्पांवर पुनर्विचार करण्यासाठी भाजप सरकारसाठी ही आणखी एक "धोक्याची घंटा" आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
गोव्यात सध्या सुरू असलेल्या ५४ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे.
गोव्यातील दिवंगत लेखक आणि भाजपचे माजी आमदार विष्णू सूर्या वाघ यांची जातिभेदावरची कविता IFFI ने आपल्या पीकॉक या दैनिकात न छापल्यावरून हा वाद निर्माण झाला आहे.
इफ्फीचे 'पीकॉक' हे दैनिक महोत्सव काळात प्रकाशित होत असते. वाघ यांनी लिहिलेल्या 'सुधीरसुक्त' (सुध्राचे स्तोत्र) या मोठ्या संग्रहाचा भाग असलेली 'सेक्युलर' नावाची ही कविता रविवारी पीकॉकमध्ये प्रकाशित होणार होती.
तथापि आंबेडकवारी कलाकार असलेल्या सिद्धेश गौतम यांना ही कविता प्रकाशित करण्यास मनाई करण्यात आली. गौतम यांनी वाघ यांना श्रद्धांजली वाहणारे पृष्ठ डिझाइन केले होते. त्यांनी एका Instagram पोस्टमध्ये ही माहिती दिली.
रेल्वेची कंपनी असलेल्या IRCTC पर्यटकांसाठी नवनवीन टूर पॅकेज देत असते. या टूर पॅकेजच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळते आणि पर्यटकही विविध पर्यटनस्थळांना स्वस्तात भेट देऊ शकतात.
IRCTC टूर पॅकेजची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते पर्यटकांना मोफत निवास आणि भोजन प्रदान करतात.
हे टूर पॅकेज मर्यादित कालावधीचे आहेत आणि या काळात पर्यटकांना नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण मोफत दिले जाते आणि विश्रांतीसाठी चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली जाते.
राणी मुखर्जी म्हणाली, 'मला अशी कोणतीही खंत नाही, पण दुर्दैवाने डेट क्लॅशमुळे मी आमिर खानच्या 'लगान' चित्रपटाचा भाग होऊ शकले नाही. आमिर माझा मित्र आहे, जेव्हा तो 'लगान'ची तयारी करत होता तेव्हा त्याने मला तो चित्रपट ऑफर केला होता. या चित्रपटातून आमिरही पहिल्यांदा निर्माता बनत होता.
गोव्यात सुरू असलेला 54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आता त्याच्या शेवटाकडे येत चालला आहे. उद्या, मंगळवारी या महोत्सवाचा समारोप असणार आहे. तत्पुर्वी आज, सोमवारी महोत्सवात दिवसभरात कोणते चित्रपट असणार आहेत, तसेच संवाद सत्रांमध्ये कोण उपस्थित राहणार आहे, याची माहिती घेऊया.
इफ्फीत आज सोमवारी बॉलीवुडमधील सुप्रसिद्ध असे चार व्हिलन म्हणजेच खलनायक इन कॉन्व्हर्सेशन या संवाद सत्रात उपस्थित राहणार आहेत.
यात जुन्या काळातील अभिनेते रणजीत, रझा मुराद, किरण कुमार आणि गुलशन ग्रोव्हर यांच्याशी सिने पत्रकार राजीव मसंद त्यांच्याशी संवाद साधतील.
५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) रविवारी दिग्गज माजी क्रिकेटपटू, श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन रेड कार्पेटवर अवतरला. मुरलीधरन याने इन कॉन्व्हर्सेशन सत्रात भाग संवादही साधला. निमित्त होते त्याच्या बायोपिकचे. कोमल नाहटा यांनी या संवाद सत्राचे सूत्रसंचालन केले.
‘A Legendary 800 - Against all odds’ असे त्याच्या बायोपिकचे नाव आहे. यात मधुर मित्तल याने मुरलीची भूमिका साकारली आहे. संवाद सत्रात मुरलीचा क्रिकेट लीजेंड बनण्यापर्यंतच्या प्रवास उलगडला गेला. यावेळी त्याने पाकिस्तानमध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर झालेला हल्ला ही क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट घटना होती, असे वक्तव्य केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.