Curlies Club Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Case: स्कार्लेटच्या प्रकरणात देखील होते ‘कर्लिस’ रेस्टॉरंट वादात; काय आहे संपूर्ण प्रकरण?

क्लबला टाळे: 14 वर्षांनंतर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

दैनिक गोमन्तक

योगेश मिराशी

म्हापसा: पंधरा वर्षीय ब्रिटिश पर्यटक स्कार्लेट इडन किलिंग हिच्या मृत्यूनंतर हणजूण किनाऱ्यावरील ‘कर्लिस’ रेस्टॉरंटचा हा परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यू प्रकरणामुळे ‘कर्लिस’ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रेस्टॉरंटमध्ये फोगट यांना जबरदस्तीने ड्रग्स पाजल्याने ‘कर्लिस’चा पहिला वादग्रस्त मजला सध्या हणजूण पोलिसांनी सील केला आहे.

(Scarlett's case also involved the 'Curly's' restaurant controversy in goa)

फोगट यांच्या मृत्यूमुळे हे रेस्टॉरंट पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सोनाली फोगट सोमवार, 22 रोजी रात्री ‘कर्लिस’ रेस्टॉरंटमध्ये गेल्या होत्या. 23 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांना हॉटेलमधून हणजूण येथील सेंट अँथनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले होते.

या क्लबमध्ये सोनाली दोघा सहकाऱ्यांसोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर हा क्लब पोलिसांकडून सील केल्याचे बोलले जाते. ‘कर्लिस’च्या तळमजल्यावर रेस्टॉरंट आहे, तर पहिल्या मजल्यावर क्लब आहे. सध्या हा क्लब पोलिसांनी सील केला असला तरी रेस्टॉरंट शनिवारी सुरू होते आणि या ठिकाणी ग्राहकांची बरीच वर्दळ सुरू होती.

2008 साली अल्पवयीन ब्रिटिश पर्यटक स्कार्लेट इडन किलिंग हिचा मृतदेह याच ‘कर्लिस’ रेस्टॉरंटसमोरील किनाऱ्यावर सापडला होता. यावेळी तिच्या आईने दावा केला होता की, स्कार्लेटवर लैंगिक अत्याचार केले आणि तिला अत्यवस्थ अवस्थेत समुद्रकिनारी सोडण्यात आले. या प्रकरणामुळे ‘कर्लिस’ रेस्टॉरंट प्रकाशझोतात आले होते. ऑगस्ट 2017 साली याच ‘कर्लिस’च्या आवारात एका वेटरला पोलिसांनी रंगेहाथ ड्रग्ससह पकडले होते. त्यावेळीही त्या वेटरसह मालक एडवीन नुनीस याला अटक झाली होती. याच वर्षी कर्लिसवर अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकून स्वयंपाकघरातील अस्वच्छता उघडकीस आणली होती. ते रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश दिले होते.

कर्लिसशी निगडित अवैध प्रकार

  • या रेस्टॉरंटच्या नावाने वागातोर ते हणजूण किनारपट्टी भागात काही बेकायदेशीर क्लब.

  • बेकायदा रेस्टॉरंट तसेच क्लबकडून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन व किनाऱ्यावर अतिक्रमण.

  • हणजूण किनाऱ्यावरील उंच टेकडीवर बहुतांश क्लब असून रात्री उशिरापर्यंत संगीत पार्ट्या चालतात. यामुळे स्थानिकांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो.

  • २०१२ साली कर्लिसवर ध्वनिप्रदूषण कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी कारवाई केली होती. मालकाविरोधात गुन्हाही नोंद केला आहे.

  • राजकीय दबावामुळे अनेकदा पोलिस तसेच सीआरझेडच्या कारवाया या केवळ फार्सच ठरतात.

  • या भागात बेकायदेशीरपणे रात्री उशिरापर्यंत रेव्ह पार्ट्या चालतात. तेथे अमली पदार्थांची विक्री आणि सेवन केले जाते, असे काही स्थानिक शॅकवाले सांगतात.

  • ड्रग्स ओव्हरडोसच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, संबंधित मालकांचे बड्या राजकारण्यांशी संबंध असल्याने कारवाई टाळली जाते, अशी चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला धडक, लहान मुलांसह 6 जण जखमी; तेलंगणातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asia Cup: फलंदाजी आणि गोलंदाजीत सचिनचा दबदबा! आशिया कपमधील मास्टर ब्लास्टरचा 'तो' ऐतिहासिक रेकॉर्ड आजही अबाधित

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT