Money  Dainik Gomantak
गोवा

Scam Latambarse Panchayat : उरलेले पैसे हडप केले का? लाटंबार्से ग्रामस्थांचा सवाल

संतप्त गावकऱ्यांनी कोमुनिदादला कोटीच्या घरात रक्कम येणे गरजेचे होते. उर्वरित पैसे गेले कुठे; तुम्ही उरलेले पैसे हडप केले का, असा प्रश्न कोमुनिदाद मंडळाला केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Scam Latambarse Panchayat : साळ, लाटंबार्से गावातील सर्व्हे क्र. ६२५/१ मधील एक लाख ९१ हजार १२५ चौ. मी. जागेत लाटंबार्से कोमुनिदाद हे मालक असून त्यात कुळाचे नावही समाविष्ट आहे.

सरकारने ही जागा नियोजित औद्योगिक वसाहतीसाठी घेतली असून भूसंपादित जागेचा मोबदल्याचा अर्धा हिस्सा कूळ तर अर्धा हिस्सा लाटंबार्से कोमुनिदाद यांना दिला. परंतु सदर जागेचे फक्त ४५ लाख रु. कोमुनिदादला मिळाले, अशी माहिती कोमुनिदादच्या कारकूनाने दिली.

संतप्त गावकऱ्यांनी कोमुनिदादला कोटीच्या घरात रक्कम येणे गरजेचे होते. उर्वरित पैसे गेले कुठे; तुम्ही उरलेले पैसे हडप केले का, असा प्रश्न कोमुनिदाद मंडळाला केला.

झालेल्या गैरव्यवहाराचा तपास करावा व योग्य ती तपासणी करून ऐकून झालेल्या पैशांच्या गैरव्यवहाराची व्यवस्थापकीय कोमुनिदाद, दक्षता खाते तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल करावी, जेणेकरून त्यांना या गैरव्यवहाराची माहिती असावी.

बाकी उरलेल्या थकीत पैशांची वसुलीची योग्य तो तपास करून करावी.जोपर्यंत उरलेले पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत कोमुनिदादने सदर जागेमधील एकाही भूखंडाची विक्री करू नये, असा ठराव लाटंबार्से कोमुनिदादच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत गावकऱ्यांनी घेऊन लाटंबार्से कोमुनिदाद मंडळाला धारेवर धरले, तसेच सदर ठराव सर्वानुमते मंजूर करून घेतला.

सदर सभा कासरपाल येथील श्री सातेरी भूमिका मंदिराच्या प्रांगणात घेण्यात आली. यावेळी लाटंबार्से परिसरातील गावकर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.मोहन नार्वेकर यांनी आभार मानले.

संमतीशिवाय सभा घेऊ नये !

कायद्याप्रमाणे कोमुनिदाद व्यवस्थापकांच्या संमतीशिवाय यापुढे सभा घेऊ नये,असा ठराव घेण्यात आला.

तर यावर उत्तर देताना कोमुनिदाद मंडळाने गावकऱ्यांना सांगितले की, सदर सभा कोर्ट खटला विषय आणि महत्वाचे विषय असल्याने ती घेण्यात आली.

सदर सभेत कोमुनिदादचे वकील विवेक दांडेकर यांनी विविध न्यायप्रविष्ट खटल्यांतील दोन लाखांचे बिल कोमुनिदादकडे सादर केले होते. दांडेकर यांना बिल देण्याचे ठरले.मुखत्यारला प्रत्येक खटल्यासाठी एक खर्च ठरवून द्यावा,असा ठरावही घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT