Leopard Sawantwadi Malewad Dainik Gomantak
गोवा

Leopard Attack: भरदिवसा बिबट्याचा थरार! वस्तीत शिरून चौघांवर हल्ला; 10 तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद करण्यात यश

Sawantwadi Malewad Leopard: मळेवाडनजीकच्या कोंडुरे-देऊळवाडी येथे रविवारी (ता. ६) भर दुपारी बिबट्याने वस्तीत शिरून चौघांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला होता.

Sameer Panditrao

मळेवाड/सावंतवाडी: मळेवाड-कोंडुरे देऊळवाडी येथे रविवारी चौघा ग्रामस्थांवर हल्ला करून गंभीर जखमी केलेल्या ‘त्या’ बिबट्याला अखेर वनविभागाने दहा तासांच्या शर्थीच्या प्रयत्नाने साेमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास जेरबंद केले. हा बिबटा पूर्ण वाढ झालेला असून, तो कुठल्याही प्रकारे जखमी किंवा आजारी नाही. त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सावंतवाडी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी सांगितले.

मळेवाडनजीकच्या कोंडुरे-देऊळवाडी येथे रविवारी (ता. ६) भर दुपारी बिबट्याने वस्तीत शिरून चौघांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये प्रभाकर मुळीक (वय ६०), सूर्यकांत सावंत (६३), आनंद न्हावी (५४), पंढरी आजगावकर (५२) हे गंभीर जखमी झाले होते. सद्य:स्थितीत त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेज (बांबोळी) येथे उपचार सुरू आहेत.

या प्रकारानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ला केलेला बिबट्या हा यातील जखमी मुळीक यांच्या घरामागील बागेत लपल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला होता. या बागेच्या चारही बाजूंनी पावसाचे पाणी साचले होते. त्या पाण्यातून बाहेर जाणे बिबट्याला कठीण असल्याने तसा संशय व्यक्त केला होता. परंतु, रविवारी उशिरापर्यंत तो निदर्शनास आला नव्हता. वनविभागाने साेमवारी सकाळी पुन्हा एकदा उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याची शोधमोहीम हाती घेतली.

साेमवारी सकाळी ८.३० वाजल्यापासून जखमी मुळीक यांच्या घरामागील बागेत वनविभागाची टीम दाखल झाली होती. यामध्ये वनक्षेत्रपाल सुहास पाटील, आजगाव वनपाल पृथ्वीराज प्रताप, मळगाव वनपाल प्रमोद राणे, आजगाव, बांदा, मळगाव, माजगाव वन परिमंडळातील वन कर्मचारी तसेच कुडाळ आणि सावंतवाडी येथील जलद कृती दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते. शोधमोहिमेत हा बिबटा मुळीक यांच्या बागेला लागून असलेल्या नदीच्या ठिकाणी मोटर पंपाच्या शेडमध्ये लपल्याचे निदर्शनास आले.

यानंतर वनविभागाने दोन पिंजऱ्याच्या सहाय्याने सापळा रचला. यामध्ये पंपाच्या शेडचा दरवाजा खालून कट करून त्या ठिकाणी लोखंडी पिंजरा बसविला. त्यानंतर शेडच्या पत्र्यावर चढून आतमध्ये पाणी ओतून त्याला हुसकावले. यानंतर बिबटा पिंजऱ्यात कैद झाला. साधारण १० तासांच्या या पकड मोहिमेला सायंकाळी सहा वाजता यश आले. मोहिमेत वनविभागाला स्थानिक ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. जेरबंद केल्यानंतर या बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेतले. हा बिबटा बिथरलेल्या अवस्थेत असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे वनक्षेत्रपाल श्री. पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्याला तत्काळ जेरबंद करा, अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली होती. या मागणीचा विचार करता मळेवाड-कोंडुरा उपसरपंच हेमंत मराठे यांनी पालकमंत्री नीतेश राणे यांच्याशी संपर्क मदत मागितली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: 100 कोटींचा 'मालक'! दिल्लीत 2 कोटींचे आलिशान घर, 4 शहरांत प्रॉपर्टी... ऋषभ पंतची Net Worth ऐकून चक्रावून जाल

Goa Politics: भाजपला हरवण्यासाठी 'नवा फॉर्म्युला'! RGPने उघडले युतीचे दरवाजे; गोव्याच्या राजकारणात मोठा बदल?

Codar: 'पूर्वी खांडोळा गावात मोठी वनराई होती, ती कापून त्यावर शहर बनवले'; कोडार आणि आयआयटीचा गोंधळ

अग्रलेख: धारगळ की वन म्हावळिंगे? भिजत घोंगडे; वेर्ण्यात उभारलेले सुसज्ज क्रिकेट मैदान

Rajmata Jijabai Karandak: अखेरच्या 10 मिनिटांत 2 गोल! गोव्याच्या महिलांना पराभवाचा धक्का; 'देविका' छत्तीसगडच्या विजयाची शिल्पकार

SCROLL FOR NEXT