Black Panther Leopard: घराच्या बाल्कनीत शिरला ‘ब्लॅक पँथर’, कुत्र्यावर केला हल्ला! मांद्रेतील घटना; CCTVमध्ये थरार कैद

Black Panther Leopard Mandrem: पेडणे तालुक्यात यापूर्वीही हरमल, मांद्रे, पार्से, तुये, नागझर या लोकवस्तीत अनेकदा बिबट्यांनी प्रवेश करून पाळीव जनावरे आणि श्वानांवर हल्ले करून त्यांना ठार केले आहे.
Black Panther Leopard Goa Mandrem
Black Panther Leopard Goa MandremDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: आस्कावाडा - मांद्रे येथील बाळकृष्ण गावकर यांच्या घराच्या बाल्कनीत आज पहाटे ‘ब्लॅक पँथर’ शिरल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.

पहाटे घराबाहेर कुत्रे भुंकत असल्याच्या आवाजाने बाळकृष्ण गावकर जागे झाले. त्यांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले असता बाल्कनीत ‘ब्लॅक पँथर’ आल्याचे त्यांना दिसले. यावेळी ‘ब्लॅक पँथर’ने त्यांच्या बाल्कनीत बसलेल्या श्वानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाजूचे कुत्रेही जोरजोरात भुंकू लागल्याने त्याने तेथून पळ काढला.

पेडणे तालुक्यात यापूर्वीही हरमल, मांद्रे, पार्से, तुये, नागझर या लोकवस्तीत अनेकदा बिबट्यांनी प्रवेश करून पाळीव जनावरे आणि श्वानांवर हल्ले करून त्यांना ठार केले आहे. आस्कावाडा - मांद्रे येथे प्रथमच ‘ब्लॅक पँथर’ आल्याने परिसरात प्रचंड भीती व्यक्त करण्यात येत आहे. वन विभागाने या ‘ब्लॅक पँथर’चा त्वरित बंदोबस्त करावा, अन्यथा मानवी जीवितास धोका आहे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Black Panther Leopard Goa Mandrem
Leopard Attack: ..रात्री समोर उभा राहिला बिबट्या! तांबडीसुर्लातील थरार; घरात घुसून केला मांजरावर हल्ला

‘ब्लॅक पँथर’ ही बिबट्याची एक दुर्मिळ प्रजाती आहे. गोव्यात अशा पँथरची संख्या सुमारे २५ असण्याची शक्यता आहे. जर तो एखाद्या मानवी वस्तीजवळ सापडत असेल, तर याचा अर्थ असा की त्याचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात येत असून तो अन्नाच्या शोधात बाहेर पडतो आहे, असे पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी सांगितले.

Black Panther Leopard Goa Mandrem
Leopard Caught: लोकवस्तीत येऊन कुत्र्यांचा, पाडसांचा फडशा पाडणारा बिबट्या जेरबंद! वनखात्याच्या प्रयत्नांना अखेर यश

अनेकवेळा अन्नाच्या शोधार्थ हे ‘ब्लॅक पँथर’ भटक्या कुत्र्यांच्या मागे लागतात. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अशा पँथरला पकडल्यास त्याचे स्थलांतर केवळ आवश्यकच नव्हे, तर त्याला त्याच्याच नैसर्गिक अधिवासात सोडणे गरजेचे आहे, असेही केरकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com