Goa Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Rain : कावंगाळ-सावईवेरे येथे घरावर झाड कोसळल्याने हानी

Goa Rain : ही घटना काल मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. ही फांदी घराच्या मागील भागावर पडल्याने सुदैवाने घरातील लोक बचावले. रविवारी सकाळी अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन ही फांदी हटविली. स्थानिक नागरिकांनीही या कामात सहकार्य केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Rain :

सावईवेरे, मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शनिवारी रात्री कावंगाळ-सावईवेरे येथील संदेश नाईक यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या झाडाची भली मोठी फांदी तुटून घरावर पडल्याने मोठे नुकसान झाले.

ही घटना काल मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. ही फांदी घराच्या मागील भागावर पडल्याने सुदैवाने घरातील लोक बचावले. रविवारी सकाळी अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन ही फांदी हटविली. स्थानिक नागरिकांनीही या कामात सहकार्य केले.

यावेळी संदेश नाईक यांनी सांगितले की, २०१९ साली घराबाहेर असलेल्या शौचालयावर भला मोठा दगड पडल्याने शौचालयाला भेगा पडून नुकसान झाले होते. त्यावेळी त्यांनी वेरे-वाघुर्मे ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार करून त्यांच्या घराच्या मागील बाजूच्या झाडांच्या फांद्या घरावर पडण्याची शक्यता असल्याने त्या कापाव्यात अशी निवेदनाद्वारे मागणी केली होती. परंतु या निवेदनाची कोणतीच दखल घेतली नसल्याने ही दूर्घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. या झाडाच्या फांद्या कापल्या असत्या तर ही दुर्घटना घडली नसती असे संदेश नाईक म्हणाले.

फांदी घरावर पडल्याने घरातील काही साहित्याची नासधूस झाली आहे. सरकारी यंत्रणेने तसेच स्थानिक आमदार तथा कला संस्कृती मंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT