अडवईतील सावईकर कुटुंबे बेघर Dainik Gomantak
गोवा

Goa: अडवईतील सावईकर कुटुंबे बेघर, पाच जणांचे संसार पाण्याखाली

पर्ये (PARYE, SATTARI) मतदार संघात येणाऱ्या भिरोंडा (Bhironda) पंचायत क्षेत्रातील काही वाड्याना पावसाचा जोरदार फटका बसला आहे.

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले - पर्ये (PARYE, SATTARI) मतदार संघात येणाऱ्या भिरोंडा (Bhironda) पंचायत क्षेत्रातील काही वाड्याना पावसाचा जोरदार फटका बसला असून, अडवई भटवाडी (Bhatwadi) येथिल सावईकर व नवाथे कुटुंब मिळून एकूण पाच घरे पुर्ण पणे जमीनदोस्त झाली असल्याने त्यांना बेघर होण्याची पाळी आली आहे. सद्या त्या कुटुंबातील सदस्यांनी शेजारी व गोठ्यात आसरा घेतला आहे.(Savaikar families in Advai are homeless, the lives of five people are under water)

सदर वाड्यावर सावईकर कुटुंबातील कृष्णा सावईकर, मनोहर सावईकर, श्रीकांत सावईकर, विद्या सावईकर, आणि व्यंकटेश नवाथे एकत्रित असलेली या पाच जणांच्या घरांना जबरदस्त फटका बसला असून, पाचही जणांची कुटुंब बेघर झाली आहे, त्यामुळे या पावसाने सावईकर तसेच नवाथे कुटुंबांचे लाखो रुपयांची नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे.

सद्या या कुटुंबातील काही सदस्यांना शेजारी तसेच काही जणांनी गोठ्यात आसरा घेतला आहे.सदर घटनेची माहिती मिळताच उत्तर गोवा जिल्हाधिकारी, सत्तरीचे उपजिल्हाधिकारी व मामलेदारानी येऊन पाहणी करून गेले असल्याची माहिती पंच उदयसिंह राणे यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

SCROLL FOR NEXT