Ravindra Bhavan  Dainik Gomantak
गोवा

Vasco: रवींद्र भवनात वर्धापनदिनानिमित्त सत्यनारायण महापुजेचे आयोजन

दैनिक गोमन्तक

वास्को: गेल्या दोन वर्षापासून सांस्कृतिक तसेच इतर कार्यक्रमा पासून बंद असलेले व सद्या सरकारी आस्थापनामुळे व्यस्त असलेल्या रवींद्र भवनात नवव्या वर्धापनदिनानिमित्त सत्यनारायण महापुजेचे आयोजन उद्या शनिवारी 10 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. कोरोना काळानंतर बहुतेक साऱ्या रवींद्र भवनात सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. मात्र रवींद्र भवन बायणा मात्र याला अपवाद आहे. जे कोरोना काळानंतर अजून कला प्रेमीसांठी सांस्कृतिक कार्यक्रमापासून वंचीत आहे.

(Satyanarayan Mahapuja organized on the occasion of anniversary at Rabindra Bhavan)

रवींद्र भवन बायणा गेल्या तिन वर्षापासून कुठल्याही कार्यक्रमाविना सुने राहिलेले आहे. हे रवींद्र भवन बंद असल्याचे मुख्य कारण म्हणजे तिथल्या वातानुकुलीत यंत्रणेची झालेली नादुरुस्ती व ज्याची दुरुस्तीसाठीची फाईल अजून सरकार दरबारी लोळत आहे.

सदर बायणा रवींद्र भवनाची वातानुकूली यंत्रणा पूर्णपणे गंजून गेलेली आहे व ती दुरुस्त करणे म्हणजे अवघड आहे अशी माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे. ही यंत्रणा आता कधी बदलली जाईल किंवा दुरुस्त केली जाईल याची कल्पनाही कुणालाही नाही. पण हे रवींद्र भवन तोपर्यन सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बंद असेल हे मात्र नक्की.

रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव यांनी सदर यंत्रणा दुरुस्त करून लवकरच रवींद्र भवन कला प्रेमींसाठी खुले करणार असल्याची ग्वाही सहा महिन्यापूर्वी दिली होती. मात्र तसे झाले नाही. रवींद्र भवनची ध्वनी व्यवस्था, रंगमंच अवकाश, प्रकाश योजना,मेकअप रूम या सर्व बाबतीत अक्षम्य हेळसांडतेने बांधलेले हे सभागृह दुर्देवाच्या फेऱ्यात आहे. आता तर ते बंदच पडलेले आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षाच्या काळात रवींद्र भवन बायणा येथे कोणतेही मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम झाले नाहीत.

वातानुकूलित यंत्रणा नादुरुस्त झाल्याने मुख्य सभागृह कायमचा बंद झाले आहे. त्यामुळे वार्षिक शालेय स्नेहसंमेलनापासून, नाटकापासून, तियात्रापासून तसेच इतर कार्यक्रमापासून रवींद्र भवनसाठी मिळणारे आर्थिक मोबदला बंद झाला आहे. रवींद्र भवन बंद असले तरी येथील कर्मचारी वर्ग तसाच आहे. संगीत वर्गातील शिक्षक व इतर कर्मचारी बिनधास्तपणे आपले दिवस पुढे ढकलत आहे. त्यांची बदली मात्र इतर ठीकाणी केलेली नसल्याने ते घरजावई होऊन बसल्याचे कलाप्रेमीकडून बोलले जाते.

सध्या हे रवींद्र भवन म्हणजे सरकारी कचऱ्यांचे भवन झाले आहे. या रवींद भवन मध्ये मामलेदार, उपजिल्हाधिकारी, आरोग्य खात्याने ताबा घेतला आहे. त्यामुळे हे रवींद्र भवन सरकारी कचेऱ्यांचे आगर बनले आहे. या कचेऱ्या तिथे कधी पर्यन्त असतील याबद्दलही कुणी काही सांगू शकत नाही. वास्कोतील अग्निशामक दलालादेखील या रवींद्र भवनचा ताबा हवा होता. मात्र त्यांची विनंती फेटाळली गेली.

दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांच्या उद्देशाने बांधलेली ही वास्तू गेली दोन वर्षाहून अधिक काळ सांस्कृतिक कार्यक्रमाविना तशीच पडून आहे. मात्र वर्धापनदिनाचे औचित्य साधून बांधण्यात येत असलेली श्री सत्यनारायण महापूजा वर्षपद्धतीप्रमाणे न चुकता केली जाते व तेव्हाच काय तो तिथला कर्मचारी वर्ग दिसतो.

दरम्यान रवींद्र भवन बायणाची कार्यकारीणी समितीची निवड गेली दोन वर्षे झाली अजून झाली नसून सध्या रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव धुरा सांभाळत आहे. कार्यकारिणी समिती नसल्याने रवींद्र भवन सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा बसलेला आहे. अध्यक्ष महाशय एकमुखी निर्णय घेऊ शकत नाही. सध्या रवींद्र भवनच्या उपाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. तसेच सदस्य पदाला अनेकजण दावा करीत आहेत.

रवींद्र भवन बायणा उद्या शनिवारी दि. 10 डिसेंबर रोजी आपला नववा वर्धापनदिन साजरा करत आहे. त्यानिमित्त दुपारी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर आरती व तिर्थप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान संध्याकाळी ६.३० वा. रवींद्र भवनच्या मिनी सभागृहात 'सूर निरागस हो या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन रवींद्र भवन तर्फे वर्धापनदिनाचे औचित्य साधून करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT