Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

St. Xavier Goa: आंदोलकांकडून कोलवा सर्कल ब्लॉक करण्यात आल्यामुळे आज वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचा फटका पर्यटकांना बसला
Tourist in Goa: आंदोलकांकडून कोलवा सर्कल ब्लॉक करण्यात आल्यामुळे आज वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचा फटका पर्यटकांना बसला
Goa Traffic IssueDainik Gomantak
Published on
Updated on

St. Xavier Controversy in Goa

सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर्स यांच्या अवशेषांच्या DNA चाचणीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते आणि त्यांनतर गोव्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात सध्या दोन गट पडले असून एका गटाकडून सुभाष वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी केली जातेय तर दुसरा गट म्हणजेच हिंदुत्ववादी संघटनां वेलिंगकरांचे समर्थन करण्यासाठी उभ्या राहिल्या आहेत.

आज सकाळपासूनच या वादामुळे पणजी, मडगाव, डिचोली अशा विविध पोलीस चौक्यांवर आंदोलकांनी मोर्चा वळवला. आंदोलकांकडून म्हापश्यातील कोलवा सर्कल ब्लॉक करण्यात आले आणि म्हणूनच मडगाव, फोंडा, कोलवा, पणजी मार्गाने येणारी वाहतूक गोवा ट्राफिक पोलिसांकडून वळवण्यात आली.

गोव्यात दोन दिवसांपूर्वीच पर्यटकांचे आगमन झाले आहे आणि आंदोलकांकडून कोलवा सर्कल ब्लॉक करण्यात आल्यामुळे आज वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचा फटका या पर्यटकांना देखील बसला. मोठ-मोठ्या बॅग घेऊन बसस्थानकापर्यंत पायी जावे लागत असल्याने पर्यटक त्रस्त झाले होते.

केवळ पर्यटकच नाही तर गोव्यातील शाळकरी मुलांना देखील या वाहतूक कोंडीमुळे त्रास सहन करावा लागला. मुलांच्या सुरक्षेखातर कदंबा ट्रान्सपोर्ट कॉपरेशन लिमिटेड कडून सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावण्याचा आदेश देण्यात आला होता.

Tourist in Goa: आंदोलकांकडून कोलवा सर्कल ब्लॉक करण्यात आल्यामुळे आज वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचा फटका पर्यटकांना बसला
Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

शांतीप्रिय प्रदेश ही गोव्याची ओळख आहे, तर प्रेम आणि आपुलकी अबाधीत ठेवणे हे सरकारची जबाबदारी आहे. ती नष्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. सदर वादाला अनुसरून कॉंग्रेस पक्षाकडून हे निवेदन जारी करण्यात आले.

यावर काहीजणं सध्या मुख्यमंत्री सावंत यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मला सांगितले आहे की सुभाष वेलिंगकर यांना कुठल्याही क्षणी अटक करण्यात येईल असे वक्त्याव आमदार डिलायला लोबो यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com