jeet Arolkar: 'सरकारात राहून युती धर्म विरोधात बोलू शकत नाही'; जीत आरोलकर यांचे विधान

मांद्रेचे मगोप आमदार जीत आरोलकर यांनी पक्षाचा निर्णय आपल्यास मान्य आहे व युती पक्षात राहून सरकार विरोधात आपण बोलू शकत नाही, असे वक्तव्य त्यांनी म्हापशात केले.
Jeet Arolkar
Jeet ArolkarDainik Gomantak

म्हापसा: मोपा विमानतळाला कुणाचे नाव देण्यात यावे यावरून सध्या राजकीय कलगीतुरा सुरू आहे, अशातच मांद्रेचे मगोप आमदार जीत आरोलकर यांनी पक्षाचा निर्णय आपल्यास मान्य आहे व युती पक्षात राहून सरकार विरोधात आपण बोलू शकत नाही, असे वक्तव्य त्यांनी म्हापशात केले.

(Political Statement Of mandrem mla Jeet Arolkar in mapusa )

Jeet Arolkar
Kadamba Bus Fire: म्हापसा येथे कदंब बसला आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

मगोपचा मी आमदार असून भाऊंचे विचार व तत्वांचा आम्ही आदर राखतो, परंतु युतीच्या सरकारमध्ये राहून युती धर्म व सरकारच्या निर्णयाविरुध्द जाऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण जीत आरोलकर यांनी यावेळी दिले. अलीकडेच मगो पक्षाने व मंत्री सुदिन ढवळीकरांनी विधान केले होते की केंद्र भाजप सरकार मोपा विमानतळाच्या नामकरणाविषयी जो निर्णय घेईल, तो मान्य असेल असे म्हटले होते. यावर म्हापशात माध्यमांनी आरोलकर यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी वरील विधान केले.

मोपा विमानतळास कोणाचे नाव द्यावे किंवा नाही हे माझ्या हातात नाही, जर असते तर आजच मी पाटी लावून ते जाहीर केले असते. पक्षात किंवा सरकारमध्ये राहून आपल्याच परिवराविरोधात बोलणे कितीपत योग्य आहे? असा सवाल आरोलकरांनी उपस्थित केला.

Jeet Arolkar
Verna Industry: स्क्रॅप गोदामाला भीषण आग; जवळपास 1 लाखांचे नुकसान

मोपा विमानतळाच्या नामकरणाविषयी याआधीच पक्षाच्या अध्यक्षांनी व नेत्यांनी विधाने केली आहेत. त्यावर मी अजून अतिरिक्त काय बोलणार. मी पक्षाच्या चिन्हावर जिंकून आलोय. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेते, तो आम्हाला मान्य करावाच लागतो असेही स्पष्टीकरण जीत यांनी दिले.

मला लाख काहीही वाटले किंवा मांद्रेत ताजमहल बांधायचे ठरविल्यास ते शक्य आहे का? माझ्या मनाला वाटले किंवा मी काहीही ठरवले तर ते संभव नाही. मी पहिल्यांदाच आमदार बनलो असून माझ्यापेक्षा वरिष्ठ नेते आहेत. माझ्या नेत्यांनी याआधीच विधाने केली असून यावर मी बोलणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे मोपा विमानतळास कुणाचे नाव द्यावे हे भाजप सरकार किंवा नागरी विमान वाहतूक ठरवेल ते आम्हास स्वीकृत असेल असे जीत आरोलकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com