Saturn, Venus align with Moon  Dainiik Gomantak
गोवा

Venus-Saturn closing: अवकाशात आज शुक्र-शनिचा अनोखा संयोग; गोव्यातही मोफत पाहता येणार, वाचा सविस्तर

असाच एक योगायोग अनेक वर्षातून घडत असून, तो गोव्यात देखील पाहता येणार आहे.

Pramod Yadav

अवकाशात अनेक रहस्यमय घटना घडत असतात, खलोशास्त्राचे प्रेमी नेहमीच ग्रह ताऱ्यांचे निरिक्षण करत असतात. यातून अनेक दुर्मिळ किंवा अनेक वर्षातून घडणाऱ्या घटना समोर येतात. अशा योगायोग किंवा अवकाशातील दुर्मिळ घटनाबाबत अनेकांना कुतूहल असते. असाच एक योगायोग अनेक वर्षातून घडत असून, तो गोव्यात देखील पाहता येणार आहे.

22 जानेवारी रोजी म्हणजेच आज शुक्र आणि शनि हे ग्रह एकमेकांच्या जवळ येणार आहेत. दोघे एकमेकांच्या केवळ 0.4 अंशांच्या अंतरावर जवळून जातील. या विलक्षण योगायोग पाहण्यासाठी गोव्यात विविध ठिकाणी मोफत सोय करण्यात आली आहे. (Saturn, Venus to align with Moon tonight)

अवकाशात नेमकं काय होणार?

अनेक वर्षानंतर शुक्र आणि शनि ग्रह एकमेकांच्या जवळ येत आहेत. 22 जानेवारी रोजी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून केवळ 0.4 अंशांच्या अंतर जवळून जातील. यामुळे शुक्र -3.9 आणि शनि 0.7 तीव्रतेने अधिक उजळ दिसणार आहेत. या घटनेला 'अपल्स' किंवा सामान्य भाषेत संयोग असे म्हणतात. (appulse or conjunction) सूर्यास्तानंतर संध्याकाळी 6.30 ते रात्री 8 दरम्यान ही घटना स्पष्टपणे पाहता येईल. दुसऱ्या दिवशी, 23 जानेवारीला, शुक्र शनीच्या वर जाईल आणि चंद्रकोर चंद्र ग्रहांच्या मालिकेत सामील होईल.

दोघांना दुर्बिणीतून सहज पाहता येईल एवढ्या जवळ ते येतील. असे खगोलशास्त्र तज्ञांनी सांगितले आहे.

गोव्यात कोठे कोठे पाहता येईल.

22 जानेवारी

जुना हाऊस, पणजी येथील सार्वजनिक खगोलशास्त्रीय वेधशाळेत, 22 जानेवारी रोजी सांयकाळी 6.30 ते 7.30 यावेळेत पाहता येईल. याशिवाय बोडगेश्वर मंदिरासमोर, म्हापसा आणि बायना बीच, वास्को येथे देखील आयोजन करण्यात आले आहे.

23 जानेवारी

23 जानेवारी रोजी मीरामार बीच, पणजी येथे सायंकाळी 6.30 ते 8.00 या वेळेत कार्यक्रम होणार आहे. तसेच, रवींद्र भवन, मडगाव आणि हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालय, हरमल येथे कार्यक्रम होईल.

सर्व ठिकाणी सहभाग विनामूल्य आणि कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT