No Water Canva
गोवा

Water Shortage: 'पाणी येईपर्यंत गप्प बसणार नाही'! सावर्डेत 8 दिवसांपासून नळ कोरडे; ग्रामस्थांचा पाणीपुरवठा विभागाला इशारा

Savardem water problem: ऐन दिवाळी सणात पाण्याविना हाल होत असल्यामुळे ग्रामस्थांनी सोमवारी वाळपई पाणीपुरवठा विभागावर धडक दिली. तसेच तातडीने पाणीपुरवठा सुरू न केल्यास मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: सत्तरी तालुक्यातील सावर्डे गावात गेल्या आठ दिवसांपासून नळ कोरडे असल्‍याने ग्रामस्‍थ संतप्त बनले आहेत. ऐन दिवाळी सणाच्‍या काळात पाण्याविना हाल होत असल्यामुळे ग्रामस्थांनी सोमवारी वाळपई पाणीपुरवठा विभागावर धडक दिली. तसेच तातडीने पाणीपुरवठा सुरू न केल्यास मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

पाण्याच्या समस्येने त्रस्त झालेल्या सावर्डेवासीयांना आता नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. काही वाड्यांवर मुबलक पाणी येत असले तरी अनेक भागांत नळ पूर्णपणे कोरडे पडले आहेत, अशी नागरिकांची तक्रार आहे.

ग्रामस्‍थ बोंबी बाळू सावंत यांनी सांगितले की, गेल्या तीन महिन्यांपूर्वी आम्हाला गढूळ पाण्याची समस्या सतावत होती. ती निकाली निघाल्यानंतर आता गेल्‍या आठ दिवसांपासून नळाद्वारे थेंबभरही पाणी आलेले नाही. ऐन दिवाळीत पाण्याविना दिवस काढावे लागत आहेत व ही अत्यंत वेदनादायक बाब आहे.

गावात नदी आणि झरा असला तरी तो सुमारे एक किलोमीटर अंतरावरआहे. उंच भागातील घरांपर्यंत नळाचे पाणी पोहोचत नाही. पाणी सोडणाऱ्या ऑपरेटरकडे विचारणा केली असता, तो दररोज वेगवेगळी कारणे देतो. महिलांनी सांगितले की, घरात स्वयंपाक, धुणीभांडी आणि पिण्याच्या पाण्यासाठी रोजचा त्रास सुरू आहे. काही घरांना दोन तासांसाठीच पाणी मिळते, तेही कमी दाबाने. एवढ्या वर्षात इतका त्रास कधी झाला नव्हता.

उंच भागात पोहोचत नाही पाणी

हरिजनवाडा, मळवाडा आणि पंचायतवाडा मिळून सुमारे ३०० नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काल रविवारी टॅंकर पाठवण्यात आला, मात्र उंच भागातील घरांपर्यंत ते पाणी पोहोचले नाही. असा टॅंकर पाठवून काय उपयोग, नळाला नियमित पाणी येईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा नागरिकांनी दिला.

गेल्या तीन महिन्यांपूर्वी आम्हाला गढूळ पाण्याची समस्या सतावत होती. ती निकाली निघाल्यानंतर आता गेल्‍या आठ दिवसांपासून नळाद्वारे थेंबभरही पाणी आलेले नाही. ऐन दिवाळीत पाण्याविना दिवस काढावे लागत आहेत.
बोंबी सावंत, ग्रामस्‍थ (सावर्डे)
वॉल्‍व बिघडल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.
योगेश सावंत, साहाय्यक अभियंता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

Goa Politics: खरी कुजबुज; भाजप खासदार काँग्रेस नेते?

SCROLL FOR NEXT