Water Supply Revenue: पाणी गळती, नादुरुस्त मीटर्स! सरकारला 5 कोटींचा फटका; नासाडी थांबवण्यासाठी एजन्सीची नेमणूक

Goa water supply issue: विद्यमान जुन्‍या वाहिन्‍यांतून होणारी पिण्‍याच्‍या पाण्‍याची गळती तसेच मीटरमधील बिघाडामुळे प्रत्‍येक महिन्‍याला सुमारे पाच कोटींच्‍या महसुलास सरकारला मुकावे लागत आहे.
Goa water supply issue
Goa water supply issueDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विद्यमान जुन्‍या वाहिन्‍यांतून होणारी पिण्‍याच्‍या पाण्‍याची गळती तसेच मीटरमधील बिघाडामुळे प्रत्‍येक महिन्‍याला सुमारे पाच कोटींच्‍या महसुलास सरकारला मुकावे लागत आहे. पाण्‍याची नासाडी थांबवण्‍यासाठी पिण्याचे पाणी खात्‍यामार्फत येत्‍या महिन्‍याभरात स्‍वतंत्र एजन्‍सीची नेमणूक करण्‍यात येणार असल्‍याची माहिती खात्‍याचे मुख्‍य अभियंता सुभाष बेळगावकर यांनी रविवारी ‘गोमन्‍तक’ला दिली.

‘गोमंतकीय जनतेला पुरेल इतके पिण्‍याचे पाणी देण्‍याचा प्रयत्‍न खात्‍याकडून सुरू आहे. परंतु, काही भागांमधील जलवाहिन्‍या अत्यंत जीर्ण झाल्‍या असून, त्‍यातून पाण्‍याची मोठ्या प्रमाणात गळती होते. त्‍यामुळे ते पाणी वाया जाते.

दुसरीकडे, अनेक भागांमधील पाण्‍याच्‍या मीटरमध्‍ये बिघाड झाला आहे. त्‍यामुळे ज्यांच्‍या मीटरमध्ये बिघाड आहे, त्‍या ग्राहकांनी वापरलेल्‍या पाण्‍याची व्यवस्थित बिले खात्‍याला मिळत नाहीत. सध्‍या पाण्‍याच्‍या बिलांपोटी सरकारला प्रत्‍येक महिन्‍याला सुमारे २० कोटींचा महसूल मिळतो.

परंतु, वाहिन्‍यांमधील बिघाडामुळे होणारी पाणी गळती आणि मीटरमधील बिघाड या दोन प्रमुख कारणांमुळे सरकारच्‍या महसुलात दर महिन्‍याला सुमारे पाच कोटींची घट होत आहे’, असे मुख्य अभियंता सुभाष बेळगावकर म्‍हणाले. दरम्‍यान, राज्‍य सरकारने काही महिन्‍यांपूर्वी पिण्‍याचे पाणी या स्‍वतंत्र खात्‍याची निर्मिती करून त्याचे मंत्रिपद सुभाष फळदेसाई यांच्‍याकडे दिले आहे.

Goa water supply issue
New Water Pipelines: '..नव्या जलवाहिन्यांसाठी 2 हजार कोटी लागतील'! मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती

खात्‍याचा कारभार हाती घेतल्‍यापासून मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पाण्‍याची नासाडी रोखून गोमंतकीय जनतेला पुरेसे पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध करून देण्‍याचे प्रयत्‍न सुरू केले आहेत. शिवाय ठिकठिकाणी नव्‍याने सुरू असलेल्‍या पाणी प्रक्रिया प्रकल्‍पांच्या कामलाही गती दिली आहे. त्‍यामुळे पुढील काही वर्षांत जनतेला आवश्‍‍यक तितके पाणी मिळेल, असा पिण्याचे पाणी खात्याला विश्‍‍वास आहे, असे बेळगावकर म्हणाले.

Goa water supply issue
Water Metro Goa: गोव्यात ‘वॉटर मेट्रो’ होणार सुरू! तेरेखोल, मांडवीला हिरवा कंदील! शापोरा जलमार्गावर फुली

गैरवापर आणि चोरीही

‘राज्‍यातील अनेक भागांमध्‍ये पिण्‍याच्‍या पाण्‍याचा तुटवडा जाणवत असतानाही काहीजणांकडून पाण्‍याचा गैरवापर होत आहे. त्‍याचा फटका इतर ठिकाणच्‍या नागरिकांना बसत आहे. काही ठिकाणी पाण्‍याची चोरीही होते. या सर्व समस्‍यांवर मात करून नागरिकांना आवश्‍‍यक तितके पाणी देण्‍यासाठी येत्‍या महिन्‍याभरात स्‍वतंत्र एजन्‍सीची नियुक्ती करण्‍याची प्रक्रिया खात्‍याने सुरू केली आहे’, असेही बेळगावकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com