Water Metro Goa: 'वॉटर मेट्रो'चे काम जोरात! कोचीहून दुसरे पथक येणार गोव्यात; लवकरच सेवा होणार सुरु

Goa Water Metro: कोची मेट्रोचे दुसरे पथक येत्या चार दिवसांत गोव्यात येणार आहे. गोव्यात वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी यापूर्वी कोची मेट्रोचे पथक येऊन मार्गांचे सर्वेक्षण करून गेले आहे.
Water Metro Goa
Goa Water MetroDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कोची मेट्रोचे दुसरे पथक येत्या चार दिवसांत गोव्यात येणार आहे. गोव्यात वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी यापूर्वी कोची मेट्रोचे पथक येऊन मार्गांचे सर्वेक्षण करून गेले आहे. परंतु दुसरे येणारे पथक हे मार्गावर स्टेशन, थांबे कोठे उभारायचे याविषयीची पाहणी करणार असल्याची माहिती नदी परिवहनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये कोची मेट्रोच्या एका पथकाने आठवडाभर जलमार्गांचा अभ्यास केला होता. त्यातून शापोरा वगळता मांडवी, तेरेखोल नदीवर वॉटर मेट्रो सुरू होऊ शकते, अशी शक्यता वर्तविली आहे. या पथकानंतर कोची मेट्रो व्यवस्थापनाने दुसरे पथक पाठविले जाईल, असे सांगितले होते, त्यानुसार आता या आठवड्यात दुसरे पथक दाखल होईल.

Water Metro Goa
Water Metro in Goa: गोव्यात येतेय पहिलीवहिली 'वॉटर मेट्रो', मुरगाव ते तिसवाडी आता करा जलप्रवास; वाचा माहिती

अगोदरच्या पथकाने केलेल्या निरीक्षणाच्या अंदाजानुसार जलमार्गावर थांबे (जेटी), स्टेशन उभारण्याविषयी ठिकाणे सूचित केली होती. त्यानुसार नव्याने येणारे पथक त्या जागांची पाहणी करून आपला अहवाल सादर करणार आहे.

Water Metro Goa
Water Metro in Goa: गोव्यात येतेय पहिलीवहिली 'वॉटर मेट्रो', मुरगाव ते तिसवाडी आता करा जलप्रवास; वाचा माहिती

केरळमध्ये कोची शहरात कोची मेट्रोने वॉटर मेट्रो सुरू केली आहे. त्याच धर्तीवर हे सेवा गोव्यातही सुरू करण्याचा केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याने हा प्रकल्प राज्य सरकारच्या माध्यमातून पुढे नेला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Goa Electric Bus
Delhi Metro Kalkaji station viral video
CM Pramod Sawant Water Metro Presentation
Calangute traffic cell electricity cut unpaid bill Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com