Lumpy Skin Disease Dainik Gomantak
गोवा

Lumpy Skin Disease: सत्तरी, फोंडा भागात लम्पीचे थैमान; पशुपालक चिंतेत

गोव्यातील सत्तरी आणि फोंडा भागातील गुरांमध्ये लम्पी स्किन आजाराचा धोका वाढताना दिसतोय. त्यामुळे राज्यातील पशुपालक सध्या चिंतेत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्रापाठोपाठ आता गोव्यातही लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गोव्यातील सत्तरी आणि फोंडा भागातील गुरांमध्ये लम्पी स्किन आजाराचा धोका वाढताना दिसतोय. त्यामुळे राज्यातील पशुपालक सध्या चिंतेत आहेत. अखिल गोवा दूध उत्पादक संघाने याबद्दल कळवले असून याबद्दल चिंता व्यक्त केलीय.

लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. लम्पी स्किन आजार हा कीटकांपासून पसरतो. नेमकी या आजाराची लक्षणे काय आहेत, पशुपालकांनी काय काळजी घ्यायला हवी याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.

लम्पी आजार कशामुळे होतो?

या रोगाची लागण कॅप्रीपॉक्स नावाच्या विषाणू मुळे होते. हा विषाणू शेळ्या व मेंढ्यांमधील देवी रोगाच्या विषाणूशी संबंधित आहे. त्याचबरोबर गुरांच्या गोठ्यातील माशा, विशिष्ट डास आणि गोचीड यांच्यामुळे सुद्धा हा आजार होतो. हा आजार मुख्यतः गायी बैल म्हैस या प्रकारातील जनावरांना होतो.

लंम्पि आजाराची लक्षणे-

  • जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येणे

  • लसिका ग्रंथींना सूज येणे.

  • जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर त्यांना 102 ते 104 पर्यंत ताप येतो.

  • त्याचबरोबर मान, पोट, कास या ठिकाणी जवळपास दहा एमएम व्यासाच्या गाठी येतात.

  • दुभती जनावरे दूध कमी देतात त्याचबरोबर पाणी आणि चारा कमी खातात.

  • काही जनावरांच्या पायाला सूज येते तर काही लंगडतात सुद्धा.

जनावरांना लम्पी आजार झाल्यास-

  • वरील प्रकारे कुठलीही लक्षणे आपल्या जनावरांना दिसून आली. तर तात्काळ आपल्या जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय विभागास माहिती द्या. 

  • लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. जनावरांच्या गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.

  • गायी आणि म्हशींना एकत्रित ठेवू नये. लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू करावे. बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता आणि तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.

  • बाधित जनावरांचा मृत्यू झाला तर कमीत कमी 8 ते 9 फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी. मृत जनावरांच्या खाली आणि वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT