Purple Fest 2023: पर्पल फेस्ट इफ्फीइतकाच मोठा करण्याचे आमचे ध्येय - फळदेसाई

गोव्यासह देशभरातील हजारो प्रतिनिधी घेणार पर्पल फेस्टचा आनंद
Purple Fest
Purple FestDainik Gomantak
Published on
Updated on

अपंग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने दिव्यांगजन आयोग, समाज कल्याण संचालनालय आणि गोवा मनोरंजन संस्था यांच्या सहकार्याने होत असलेल्या पर्पल फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी तब्बल 5,000 दिव्यांगांनी नोंदणी केली आहे. 6 जानेवारीपासून पणजीत सुरू होणार्‍या पर्पल फेस्ट कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी विविध उपक्रम आणि ठिकाणांसाठी मार्गदर्शक असलेल्या माहितीपत्रकाचे प्रकाशन केले आहे.

"कार्यक्रम आणि संवादांच्या माध्यमातून आम्हाला गोव्यातील आणि देशभरातील अपंग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असल्याने हा कार्यक्रम इफ्फीइतका मोठा करण्याच्या ध्येयाने आम्ही पूर्णपणे सज्ज झालो आहोत," असे फळदेसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Purple Fest
Mahadayi Water Dispute : ...म्हणून म्हादईप्रश्नी सुप्रीम कोर्टात सुनावणी नाही; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण

या महोत्सवासाठी देशभरातील अपंग समुदायाचे सदस्य आणि इतर व्यक्तींसह 5,000 हून अधिक प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. या कार्यक्रमात 1,000 स्थानिक स्वयंसेवक प्रतिनिधींना आणि सर्व उपस्थितांना तीन दिवस मदत करणार आहेत.

Purple Fest
Panjim: मनोहर विमानतळ 8 शहरांना जोडणार; ‘इंडिगो’ची आठवड्याला 168 उड्डाणे

"पर्पल फेस्ट हा आमच्यासाठी गोव्यातील ऐतिहासिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा उद्देश दिव्यांग लोकांना त्यांच्या अपंगत्वावर मात करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. आम्हाला या महोत्सवासाठी 3,000 प्रतिनिधी येतील असा अंदाज होता पण तब्बल 5,000 प्रतिनिधींनी नोंदणी केलीय" असे गुरुप्रसाद पावसकर यांनी सांगीतलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com