Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Bison: सावंतवाडीतील शिरोडा नाका परिसरात तब्बल ११ गवारेड्यांचा कळप आढळून आला आहे. जंगलातून बाहेर आलेल्या या गवारेड्यांच्या कळपामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
Bison In Sawantwadi
Bison In SawantwadiDainik Gomantak
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : सावंतवाडीतील शिरोडा नाका परिसरात तब्बल ११ गवारेड्यांचा कळप आढळून आला आहे. जंगलातून बाहेर आलेल्या या गवारेड्यांच्या कळपामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. या कळपाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, मात्र एवढ्या संख्येने गवे एका ठिकाणी दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.

शिरोडा नाका परिसरात एका वेळेस एवढ्या मोठ्या संख्येने गवे बाहेर आल्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी हा कळप उतरला होता. काही वेळ तेथेच थांबून पुन्हा जंगलाच्या दिशेने ते निघून गेले.

Bison In Sawantwadi
Goa Mangroves: 'खारफुटी हटवा, खाजन वाचवा'! गोवा फाऊंडेशन कोर्टात, पंचायतींकडून पत्रे; का आलीय शेती संकटात? वाचा..

या घटनेमुळे सावंतवाडी शहरातील नागरीकांमध्ये भीती निर्माण झाली असून वनविभागाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे. गवे आक्रमक स्वभावाचे असल्याने गर्दी करणे धोकादायक असते, असा इशाराही वनविभागाने दिला आहे.

दरम्यान, या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. बांगायतदारांनाही या गवारेड्यांच्या कळपामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Bison In Sawantwadi
Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

याआधी, कोलगाव परिसरात एका वेळेस १५ गवे आढळून आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने गवे बाहेर आल्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. सावंतवाडी शहरात गव्यांचा वावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com