Sattari illegal quarry Dainik Gomantak
गोवा

Sattari Raid: खाण खात्याची मोठी कारवाई! सत्तरीत 3 चिरेखाणींवर छापा; 35 लाखांची मशिनरी जप्त

Sattari Mining Raid: सत्तरी तालुक्यात वेगवेगळ्या भागातील तीन बेकायदेशीर चिरेखाणींविरोधात अचानक छापा टाकून खाण खात्याने मोठी कारवाई केली आहे.

Sameer Panditrao

वाळपई,: सत्तरी तालुक्यात वेगवेगळ्या भागातील तीन बेकायदेशीर चिरेखाणींविरोधात अचानक छापा टाकून खाण खात्याने मोठी कारवाई केली आहे.

यामध्ये वाळपई मतदारसंघातील मलपण आणि शेळप येथील दोन चिरेखाणींवर तसेच पर्ये मतदारसंघातील पिसुर्ले येथे छापा टाकून कारवाई करण्यात आली. मलपण व शेळप-सत्तरी या ठिकाणी तब्बल तीन ट्रक, जेसीबी, कटिंग मशिन्स आणि पॉवर जनरेटर्स अशी एकूण ३५ लाख रुपये किमतीची मशिनरी जप्त करण्यात आली. सर्व मशिनरी सील करून वाळपई पोलिस स्थानकात यासंदर्भात खाण व खनिज कायद्यानुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, पिसुर्ले परिसरातील बेकायदेशीर चिरेखाणीवरही छापा टाकण्यात आला. या ठिकाणी चार कटिंग मशिन्स आणि चार जनरेटर्स जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत सुमारे ३ लाख रुपये आहे.

खाण खात्याने खाणीवरील साहित्य जप्त केले. मात्र, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. त्याचबरोबर खाणींच्या मालकांविरुद्ध कोणतीही थेट कारवाई करण्यात आलेली नाही. पोलिस जमिनीच्या मालकाचा शोध घेत असून कागदपत्रांच्या छाननीनंतरच पुढील कारवाई होणार आहे. त्यामुळे वाळपई पोलिस स्थानकात सध्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. या कारवाईमुळे सत्तरीतील बेकायदेशीर चिरेखाणींचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आलेला अाहे.

सत्तरीत बेकायदेशीर चिरेखाणींचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून तालुक्यात १५ ते २० चिरेखाणी बिनधास्तपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. अनेकवेळा कारवाई होऊनही काही दिवसांनी पुन्हा या खाणी सुरू होतात. ही कारवाई शुक्रवार, १९ रोजी करण्यात आली असून सध्या सर्व मशिनरी जप्त करून पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेली आहे.

कारवाई सुरूच राहणार

सत्तरीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर चिरेखाणींमध्ये वाढ होत असून बहुतेक ठिकाणी रात्रंदिवस मशिनद्वारे मोठ्या प्रमाणात चिरे उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

यासंदर्भात खाण खात्याकडे आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. तसेच यापुढे अशाप्रकारे छापा टाकून कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lisbon vs Goa travel: गोव्यात पोर्तुगीज आलेच नसते तर पोदेर, उंडे असते का?

Zubeen Garg Death: गायक झुबीन गर्गचा मृत्यू स्कूबा डायव्हिंगमुळे नव्हे तर 'या' कारणामुळे, पत्नीनं केला धक्कादायक खुलासा Watch Video

India vs Pakistan: हाय होल्टेज सामन्यात 'मिस्टर 360' रचणार इतिहास, 'अशी' कामगिरी करणारा जगातील पाचवा फलंदाज बनेल; फक्त...

Maratha Kunbi: ‘सोर्‍हाटीचा देव माणदेशा आला’! छत्रपतींच्या भोसले घराण्याचे कन्नड प्रदेशाशी असणारे घट्ट संबंध; मराठा कुणबी इतिहास

Mhadei River: 'म्हादई' प्रश्नाची तीव्रता कळत असूनही गोवा का तोंड वळवून उभा आहे? तो मुठी का आवळत नाही?

SCROLL FOR NEXT