Chorla Ghat News Dainik Gomantak
गोवा

Chorla Ghat: चोर्लाघाट ठरतोय ‘मृत्‍यूचा सापळा’! ठिसूळ झाडे, दरडी; प्रवाशांचा जीव धोक्यात

Chorla Ghat Road Update: केरी चेकनाक्यापासून १८ किलोमीटरपर्यंतचा घाटमार्ग अतिशय अरुंद व वळणदार आहे. मुसळधार पावसात अनेक ठिकाणी मातीचे ढिगारे रस्त्यावर कोसळले आहेत.

Sameer Panditrao

वाळपई: सत्तरीतील चोर्लाघाट पुन्हा एकदा वाहतुकीस धोकादायक बनला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यालगतची झाडे लोंबकळू लागली असून मोठमोठ्या झाडांच्या फांद्या सरळ वाहनांवर आदळत आहेत. ठिसूळ झालेली झाडे कधी कोसळतील याचा नेम नाही.

दररोज हजारो वाहने या घाटातून जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍‍न गंभीर बनला आहे. केरी चेकनाक्यापासून १८ किलोमीटरपर्यंतचा घाटमार्ग अतिशय अरुंद व वळणदार आहे. मुसळधार पावसात अनेक ठिकाणी मातीचे ढिगारे रस्त्यावर कोसळले आहेत.

स्थानिकांच्या मते, सरकारने झाडे व दरडींचे कायमस्वरूपी सर्वेक्षण करून मजबूत संरक्षक भिंती उभारल्या नाहीत तर मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. प्रवासी व वाहनचालकांचा रोष वाढला आहे. वाहने चालवताना कधी फांदी लागेल, कधी दरड कोसळेल याचा नेम नसतो. आम्ही रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतो, असे स्थानिक वाहनचालकांनी सांगितले.

वाहनचालकांच्‍या प्रमुख मागण्‍या

धोकादायक झाडांची तातडीने कापणी व छाटणी

दरडींचे सर्वेक्षण करून कायमस्वरूपी संरक्षक भिंती

पावसाळ्यात तत्काळ प्रतिसाद देणारी आपत्कालीन यंत्रणा

चोर्लाघाटातील वाहतुकीसाठी सुरक्षेची हमी; चर बुजवणे गरजेचे

चोर्लाघाटातील प्रमुख धोके

लोंबकळणाऱ्या फांद्या मोठ्या वाहनांना अडथळा

पावसामुळे झाडे ठिसूळ होऊन कोसळण्याची शक्यता

दरडी कोसळल्याने रस्ते वारंवार होतात बंद

प्रवाशांचा जीव आलाय धोक्यात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: कला अकादमीच्या नूतनीकरणात '50 कोटी' वायफळ खर्च! टास्क फोर्सकडून गंभीर चिंता व्यक्त; IIT मद्रासच्या अहवालातून त्रुटी उघड

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीसह शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदार संभ्रमात; झाली 'इतक्या' रुपयांची घट

Horoscope: लक्ष्मी मातेची कृपा! 'या' राशींना मिळणार धनलाभ आणि सुखाची बातमी, वाचा भविष्य!

VHT 2025-26: विजय हजारे ट्रॉफीचा थरार! मुंबई-दिल्लीसह 8 संघ सज्ज; पाहा उपांत्यपूर्व फेरीचं संपूर्ण वेळापत्रक

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

SCROLL FOR NEXT