Chorla Ghat Road: 10 तासानंतर चोर्ला घाट सुरु, 13 कि.मी.वाहनांच्या रांगा; नोकरदार - विद्यार्थ्यांचे हाल, Video

Belgaum Goa road update: अवजड वाहतूक करणारी एक लॉरी रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने व तेथेच दुसरी लॉरी रस्त्याकडेला कलंडल्याने या मार्गावरील वाहतूक दहा तास खोळंबली.

कालमनी व आमटे दरम्यान अवजड वाहतूक करणारी एक लॉरी रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने व तेथेच दुसरी लॉरी रस्त्याकडेला कलंडल्याने या मार्गावरील वाहतूक दहा तास खोळंबली. दोन अवजड वाहने रस्त्यावरच अडकल्यामुळे सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सुमारे १३ कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे भर पावसात प्रवाशांचे मोठे हाल झाले.

दरम्यान, रस्त्यावर बंद पडलेली लॉरी बाजूला काढल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. या घटनेमुळे सकाळपासून शाळा–कॉलेजला जाणारे विद्यार्थी, नोकरी व व्यवसायासाठी प्रवास करणारे नागरिक त्रस्त झाले. सध्या चतुर्थीचे दिवस असल्याने गोवा - कर्नाटक दरम्यान वाहतूक करणाऱ्या नागरिकांवर मोठा परिणाम झाला. गोवा - कर्नाटक दरम्यान बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दहा तास ताटकळत उपाशी रहावे लागले. त्याचबरोबर बेळगावहून गोव्यात येणारी भाजी, दूध व इतर साहित्य वेळेवर पोहोचले नाही. त्यामुळे याचा व्यवसायावरही मोठा परिणाम झाला.

कर्नाटक प्रशासनाबद्दल प्रवाशांत तीव्र संताप

रविवारी मध्यरात्री बंद पडलेली लॉरी सोमवारी संध्याकाळपर्यंत काढली नाही. त्यामुळे नागरिकांनी कर्नाटक प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. स्थानिक नागरिक व प्रवाशांनी प्रशासनाकडे तात्काळ धाव घेऊन रस्ता मोकळा करण्याची मागणी केल्यानंतर संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान वाहन बाजूला काढून रस्ता मोकळा करण्यात आला व प्रवासात अडकून पडलेल्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com