Satish Golcha, Omvir Sing Bishnoi  Canava, aajtak.in, twitter
गोवा

Goa DGP: गोव्यात येण्याची गोलचा यांची इच्छा नाही; अन्य अधिकाऱ्यांच्या नावाचा शोध सुरू

Goa Police: राज्याचे नवे पोलिस महासंचालक कोण यावर अजून शिक्कामोर्तब नाही

गोमन्तक डिजिटल टीम

राज्याचे नवे पोलिस महासंचालक कोण, यावर केंद्रीय गृह मंत्रालय आज सायंकाळी उशिरापर्यंत शिक्कामोर्तब करू शकले नव्हते. १९९२ च्या तुकडीचे भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी सतीश गोलचा हे गोव्यात येण्यास इच्छुक नसल्याने आता अन्य अधिकाऱ्यांच्या नावाचा शोध घेतला जात आहे.

तथापि, रजेवर अमेरिकेत असलेले पोलिस महानिरीक्षक ओमवीरसिंह बिष्णोई हेही अद्याप राज्यात पोचलेले नाहीत. बिष्णोई यांच्या रजेत मी किंवा मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांनी कपात केली नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महासंचालकांची बदली होण्याआधी दिल्लीतून दुसऱ्या अधिकाऱ्याची बदली गोव्यात जाईल.

एकाच बदली आदेशात या दोन्ही अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश असेल, असे सांगण्यात येत आहे. दिल्लीत असलेले मुख्यमंत्री सावंत हे गृहमंत्री अमित शहा यांना भेटू न शकल्याने महासंचालकांच्या नावाविषयी चर्चा होऊ शकलेली नाही.

काही राज्यांच्या महासंचालकांचा कालावधी संपल्याने त्यांनी दिल्लीत येण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यापैकी एकाची वर्णी गोव्याच्या महासंचालकपदी लागू शकते. मात्र, सर्वांच्या बदलीचा आदेश एकत्रित काढला जाणार असल्याने त्याला आणखी एक दिवस लागू शकतो, अशी माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 Cricket: 19 वर्षांच्या पोरानं उडवली कांगारुंची झोप! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात घडवला इतिहास; नावावर केला मोठा रेकॉर्ड!

Cyber Fraud: सारवी, कविता, दिनाज, जास्मिन... चौघींच्या प्रेमात 80 वर्षीय मुंबईकर कंगाल, 9 कोटींना घातला गंडा

Viral Video: अजब फॅशन! महिलेने जिवंत बेडकाचे बनवले 'नेकलेस', व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण; तुम्ही पाहिलाय का?

IND vs AUS: भारताचा 'क्लीन स्वीप'! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात शेफालीची खेळी ठरली व्यर्थ; कांगारुंनी मारली बाजी

Crime News: माणुसकीला काळिमा फासणारी घटना! 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; आरोपींच्या क्रूर कृत्याने हादरले उत्तराखंड

SCROLL FOR NEXT