Literary and Cultural Conference Dainik Gomantak
गोवा

सत्तरी तालुका साहित्य व सांस्कृतिक संमेलन 27 फेब्रुवारीला

संमेलनाचे आयोजन श्री गुरुदेव दत्तमंदिर पाली, ठाणे, सत्तरी गोवा येथे करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

गुळेली : मराठी अकादमी पुरस्कृत, सत्तरी तालुका प्रभाग आयोजित साहित्य व सांस्कृतिक संमेलन 2022 हे रविवार 27 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे. याचे आयोजन श्री गुरुदेव दत्तमंदिर पाली, ठाणे, सत्तरी गोवा येथे करण्यात आले आहे.

साहित्य व सांस्कृतिक संमेलनाच्या (Literary and Cultural Conference) निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी 7.30 वा. श्री सातेरी मंदिराकडून ग्रंथदिंडीस सुरूवात होईल. तर बाबुसो गांवकर (माजी मुख्याध्यापक) यांच्या अध्यक्षतेखाली पांडुरंग गावकर (संपादक, दै. गोवन वार्ता) यांचे हस्ते सकाळी 9.00 ते 11.00 वा. उद्घाटन सोहळा होणार आहे. यावेळी स. 11.00 ते 11.30 दरम्यान सैनिक गोविंद गांवकर आणि अशोक गावकर यांचा गौरव करण्यात येईल.

यावेळी प्रमुख वक्ते प्रा. डॉ. विनोद गायकवाड (प्रसिध्द साहित्यिक, बेळगाव) स्वागताध्यक्ष, नरहरी हळदणकर (माजी उपसभापती, गोवा राज्य), आनंद मयेकर (संचालक, गोवा मराठी अकादमी), रामकृष्ण गावस (सचिव, सत्तरी तालुका समिती), रामनाथ खोत (कार्याध्यक्ष, मराठी साहित्य सांस्कृतिक संमेलन), रोहिदास गांवकर (सचिव, मराठी साहित्य सांस्कृतिक संमेलन), देविदास सावंत (अध्यक्ष, दत्तमंदिर देवस्थान समिती) आदी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी सरकारी प्राथमिक शाळांची दशा व दिशा या विषयावर परिसंवाद होणार आहे. तसेच कविसंमेलन, शिववंदना, नाट्यगीत, भक्तिगीत, शास्त्रीय संगीत, अभंग, भावगीत, जात्यावरील ओव्या ही नागरिकांना ऐकायला मिळणार आहेत. तर कळशी नृत्य ही पाहता येणार आहे. यानंतर संध्याकाळी 5.30 ते 6 वा. समारोप सोहळा व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल असे गोवा मराठी अकादमी, पणजी गोवा सत्तरी तालुका प्रभाग आयोजन समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे.

परिसंवादात सहभागी मान्यवर :

चंद्रकांत महादेव गावस (सदस्य, गोवा मराठी अकादमी) सहभाग पौर्णिमा केरकर (साहित्यिका), भालचंद्र मयेकर (साहित्यिक) उपस्थित असतील. सवेष सादरीकरण सहभाग विष्णू गावस आणि आदिनाथ बोट्टारकर

सहभागी मान्यवर कविसंमेलन : अध्यक्ष आनंद मयेकर (सदस्य-गोवा मराठी अकादमी) निमंत्रित कवी संदिप केळकर, अॅड. शिवाजी देसाई, प्रकाश ठवण, राघोबा पेडणेकर, हिरा गांवकर, सरोजनी गावकर, अनुराधा म्हाळशेकर, सुमिक्षा गांवकर, नारायण गावस आणि सत्तरीतील नवोदित कवी

शिववंदना : अमित भोसले व समूह

नाट्यगीत : ज्ञानेश्वर गावस

भक्तिगीत : संदिप गांवकर

शास्त्रीय संगीत : गुरुदास गावस

अभंग : प्रविण नाईक

भावगीत : मनोज गणपुले

जात्यावरील ओव्या : सरोजनी गावकर

कळशी नृत्य : वनदेवी गट, नानेली सत्तरी

फुगडी : ज्ञानज्योती महिला मंडळ केरी सत्तरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT