Shivendra Raje Bhosale Dainik Gomantak
गोवा

Shivendra Raje Bhosale : साताऱ्यातील छत्रपतींचे वारसदार गोव्यात रमले, म्हणाले असा गोवा...

चिखली येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले

गोमन्तक डिजिटल टीम

Shivendra Raje Bhosale : आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असलेल्या गोव्याला अनेक लोक भेट देतात. इतके लोक मराठी बोलतात किंवा शिवरायांच्या ऐवढ्या मूर्ती आहेत किंवा गोव्यात खूप लोक शिवाजी महाराजांची पूजा करतात हे कधीच माहीत नव्हते असे भावोद्गार छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि महाराष्ट्राचे सातारा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.

रविवारी चिकली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचे दर्शन त्यांनी घेतले. शिवेंद्रसिंहराजे भोसले काल सप्तकोटेश्वर मंदिराच्या लोकापर्ण सोहळ्यासाठी आले असता आज चिखली येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भेट दिली.

शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे बोलताना म्हणाले की, मराठी माणूस आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरीत झालेला हिंदू समाज यांना आज भेट देता आली आणि एकमेकांचे विचार समजून घेण्याची संधी प्राप्त झाली हेच महत्वाचे आहे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर सगळ्यांनी प्रेम ठेवावं. गोव्यामध्ये छत्रपतींबद्दल एवढे प्रेम असलेले आणि मराठी बोलणारी लोकं मोठ्या प्रमाणात गोव्यामध्ये आहेत हे मला कालच्या कार्यक्रमामधून कळून आले. मराठी माणूस गोव्यामध्ये तसेच एवढी भक्ती एवढी श्रध्दा गोवेकरांची छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे हे आम्हा महाराष्ट्रातून येणाऱ्यांना कधी जाणवले नाही.

यावेळी पुरोहित प्रसाद भट यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. तसेच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिवाजी महाराजांच्या चरणावर फूल अर्पण करून शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. यावेळी इतर शिवप्रेमींनीही शिवचरणी पुष्प अर्पण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

रेस्टॉरंटमध्ये अचानक घुसला 'छोटा' पाहुणा, कर्मचाऱ्याने प्रेमाने दिला नाश्ता; हृदयस्पर्शी Video Viral

Goa Assembly Session: समुद्रकिनाऱ्यांवरून बेकायदेशीर दलाल आणि मार्गदर्शकांना हटवा

Gautam Gambhir Fight: तू येथून निघ... पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! पाहा VIDEO

धारगळच्या कमांड एरियातील जमीन केवळ कॅसिनोसाठी डेल्टा कंपनीला दिली; आलेमाव यांचा आरोप

SCROLL FOR NEXT