सासष्टी : उन्हाळ्यात प्रवाशांना गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने खास ज्यादा प्रवासी गाड्यांची व्यवस्था केली आहे. रेल्वे क्रमांक 01211व 01212 या गाड्या पुणे ते सावंतवाडी व परत या मार्गावर आठवड्यातून एकदा धावतील.
01211क्रमांकाची गाडी 2 एप्रिल ते 4 जूनपर्यंत दर रविवारी पुण्याहून संध्याकाळी 9.30 वाजता सुटेल व सावंतवाडी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजता पोहोचेल. 01212 ही गाडी सावंतवाडीहून दर बुधवारी 5 एप्रिल ते 7 जूनपर्यंत सकाळी 10.10 वाजता सुटेल व पुण्यात त्याच दिवशी रात्री 11.55 वाजता पोहोचेल.
01216 या क्रमाकांची गाडी सावंतवाडीहून 3 एप्रिल ते 5 जूनपर्यंत दर सोमवारी सकाळी 10.10 वाजता सुटेल व पनवेलला त्याच दिवशी रात्री 8.30 वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे 01215 क्रमांकाची गाडी 4 एप्रिल ते 6 जूनपर्यंत दर मंगळवारी पनवेलहून रात्री 9.30 वाजता सुटेल व सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता पोहोचेल. पनवेल ते करमळी या मार्गावरसुद्धा खास रेल्वेची व्यवस्था केली आहे.
01213क्रमांकाची गाडी 3 एप्रिल ते 5 जूनपर्यंत दर सोमवारी पनवेलहून रात्री 9.30 वाजता सुटेल व करमळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे 01214 क्रमांकाची गाडी 4 एप्रिल ते 6 जूनपर्यंत दर मंगळवारी करमळीहून सकाळी 9.20 वाजता सुटेल व पनवेलला त्याच दिवशी रात्री 8.30 वाजता पोहोचेल.
या सर्व गाड्यांचे आरक्षण 31 मार्चपासून सुरू झाल्याचे व प्रवाशांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
मुंबई-कन्याकुमारी सुपरफास्ट गाडी
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते कन्याकुमारी या सुपरफास्ट लांब पल्ल्याच्या गाडीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.01463 क्रमांकाची गाडी 6 एप्रिल ते 1 जूनपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहून संध्याकाळी ४ वाजता सुटेल व कन्याकुमारीला दुसऱ्या दिवशी रात्री 11.20 वाजता पोहोचेल. तसेच 01464 ही गाडी कन्याकुमारीहून 8 एप्रिल ते 3 जूनपर्यंत दर शनिवारी दुपारी 2.15 वाजता सुटेल व लोकमान्य टिळक स्थानकावर दुसऱ्या दिवशी रात्री 9.50 वाजता पोहोचेल. गोव्यात या गाडीचा थांबा केवळ मडगाव स्थानकावर असेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.