काळे खुबे
काळे खुबे Gomantak Digital Team
गोवा

Bicholim News : तीस वर्षांच्या खंडानंतर सर्वण नदीत ‘काळे खुबे’!

गोमन्तक डिजिटल टीम

जवळपास तीस वर्षांच्या खंडानंतर सर्वण नदीत यंदा जलसंपत्ती असलेले 'काळे खुबे' पडले असून, मोठ्या प्रमाणात खुब्यांचे पीक आले आहे. सर्वण-कारापूर भागातून वाहणाऱ्या मांडवी नदीच्या पात्रात सर्वण परिसरात हे काळे खुबे पडल्याची माहिती मिळाली आहे.

खाणबंदीमुळे या नदीतील खनिज प्रदूषण नियंत्रणात आल्याने पुन्हा खुब्यांची उत्पत्ती झाली असावी, असे जाणकारांचे मत आहे. तीस वर्षांच्या कालखंडानंतर खुबे पडल्याने स्थानिकांमध्येही कुतूहल निर्माण झाले असून, ओहोटीच्यावेळी खुबे काढण्यासाठी सध्या खवय्यांची पावले नदीकडे वळत आहेत.

तीस वर्षांपूर्वी सर्वण-कारापूर भागातून वाहणाऱ्या मांडवी नदीच्या पात्रात 'कोळशेकात्र' परिसरात मांडोळ्यांसह मोठ्या प्रमाणात काळ्या खुब्यांचे पीक येत असे. मात्र कालांतराने या नदीतून अचानक खुबे गायब झाले. मांडोळ्यांचे पीक मात्र दरवर्षी येत आहे. यंदाही मांडोळ्या पडल्या आहेत.

जलसंपत्ती असलेल्या खुब्यांची उत्पत्ती अचानक बंद झाल्याने अनेक तर्कवितर्क पुढे येत होते. मांडोळ्यांच्या उत्पत्तीमुळे खुब्यांच्या उत्पत्तीवर परिणाम झाला असावा. खनिज प्रदूषणामुळे खुब्यांच्या उत्पत्तीवर परिणाम झाल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत होते. त्यामुळे खुब्यांची उत्पत्ती नामशेष झाली, असे लोकांनी गृहीत धरले होते. मात्र खुब्यांचे दर्शन घडल्याने लोकांची उत्सुकता वाढली आहे.

खाणबंदीमुळे उत्पत्ती शक्य

सर्वण परिसरातील नदीचा भाग हा धबधबा येथील खाण परिसराला जवळपास आहे. त्यामुळे ही नदी खनिज प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. पावसाळ्यात तर या नदीत खनिज मिश्रित पाणी मिसळत असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून खाण व्यवसाय बंद असल्याने या नदीतील खनिज प्रदूषण बरेच नियंत्रणात आले आहे. त्यामुळे खुब्यांची पुनःश्च उत्पत्ती सुरू झाली असावी, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. पर्यावरणप्रेमींचेही हेच म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेसची गोव्याला येणारी फ्लाईट रद्द, दिल्ली विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ Video

Goa Today's Live News: भूतान आणि मंगोलियातील आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी ओल्ड गोवा चर्चला भेट

Delhi Excise Policy Case: केजरीवाल विरुद्ध आमच्याकडे पुरावे, राजकारणाशी आमचा संबंध नाही; ED

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

SCROLL FOR NEXT