panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Panchayat Election : गोव्यात 186 पंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक 22 ऑगस्टला होणार

186 पंचायतींपैकी 150 हून अधिक पंचायतींमध्ये भाजपचाच सरपंच विराजमान होईल असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला होता.

आदित्य जोशी

Panchayat Election : गोव्यात नुकताच पंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. भाजपच्या उमेदवारांना मतदानांनी कौल दिल्याचं एकंदर चित्र असून 186 पंचायतींपैकी 150 हून अधिक पंचायतींमध्ये भाजपचाच सरपंच विराजमान होईल असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला होता. आता हे चित्रही लवकरच स्पष्ट होणार आहे, कारण सरपंच आणि उपसरपंच पदासाठी निवडणूक 22 ऑगस्टला होणार आहे.

पंचायत निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असून भाजपची ग्रामीण भागातली ताकद ही मजबूत दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना ‘राज्यातील 150 पेक्षा जास्त पंचायतींवर भाजपचे सरपंच निवडून येतील’ असा दावा मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला आहे.

‘राज्यात 80 टक्क्यांहून अधिक जनता ग्रामीण भागात राहते. या ग्रामीण भागावर भाजपची पकड मजबूत आहे हे या निवडणुकीने स्पष्ट केले. 2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतर गेले चार महिने मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार अत्यंत कुशलतेने काम करत आहे. त्याचाच हा परिणाम आहे. लोकांनी मोठ्या प्रमाणात भाजपला कौल दिला असून आमच्या आमदार आणि समर्थक आमदारांच्या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजप समर्थक निवडून आले आहे’ असे मत सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केले.

राज्यातील 186 पंचायतींच्या 1,464 प्रभागांसाठीची मतमोजणी शुक्रवारी पार पडली. सर्वज जागांचे निकाल स्पष्ट झाले असून ग्रामीण भागातील पंचायतींमध्ये नव्या चेहऱ्यांना पसंती मिळाल्याचे चित्र आहे. अनेक प्रस्थापित आणि त्यांच्या समर्थकांना जनतेने झिडकारले असून त्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना पंच म्हणून पसंती दिली आहे. याशिवाय विद्यमान मंत्री, आमदार आणि नेत्यांनाही काही ठिकाणी झटके देऊन जनतेने सर्व काही अलबेल नसल्याचे अप्रत्यक्षरित्या इशारा दिला आहे.

राज्यातील 191 पैकी 186 पंचायतींच्या निवडणुकीसाठी 10 ऑगस्ट रोजी मतदान झाले होते. या पंचायतींच्या 1528 प्रभागांपैकी 64 उमेदवार यापूर्वीच निवडून आल्याने 1464 जागांसाठी मतमोजणी संबंधित तालुक्यांच्या ठिकाणी पार पडली. यासाठी 5038 उमेदवार रिंगणात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT