Water tanker Service Dainik Gomantak
गोवा

Goa News : दिव्यांग बहिणीचे निधन; सरपंच भाऊ बहिणीच्या स्मरणार्थ स्वखर्चाने भागवतोय गावाची तहान

दिव्यांग बहिणीच्या स्मरणार्थ सरपंच भावाचा कौतुकास्पाद उपक्रम

दैनिक गोमन्तक डिजिटल

हरमल येथील पंचायत क्षेत्रात पाणी टंचाईने हाहाकार उडवल्याने व पाणीपुरवठा खात्याचे नळ कुचकामी ठरल्याने सरपंच बर्नार्ड फर्नांडिस यांनी टॅंकरने पाणीपुरवठा केला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

बर्नार्ड फर्नांडिस यांनी आपली दिवंगत बहीण पेलेग्रीन हिच्या नावे टॅंकर सेवा सुरू करून पंचायत हद्दीतील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची योजना चालीस लावली.

गेल्या महिनाभरात नागरिकांचे झालेले हाल व सरपंच या नात्याने लोकांचे आलेले फोन कॉल पाहून आपण टॅंकर खरेदी करण्याचा निर्णय घेतला व लोकांना पाणी देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सरपंच फर्नांडिस यांनी सांगितले.

गेल्या पंचायत निवडणुकीत प्रभाग चारमधील मतदारांनी त्यांची बिनविरोध निवड केली. जनतेची मागणी पूर्ण करण्यासाठी आपला नेहमीच प्रयत्न असून प्रभाग व गावातील नागरिकांनी पाण्यासाठी संपर्क करावा, असे आवाहन सरपंच फर्नांडिस यांनी केले आहे.

बोअरवेलच्या कामांस स्थगिती द्या

‘आंब्याचे पाणी’ या विहिरीचे पाणी आटण्याच्या स्थितीस बोअरवेल कारणीभूत असून त्या भागात तीन-चार बोअरवेल खोदल्याने पाण्याची पातळी खाली गेली असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. बोअरवेल खोदकामांना परवाना देण्यासाठी स्वतंत्र खाते असून त्याबाबत आम्ही काहीही करू शकत नसल्याचे अभियंता ठाकूर यांनी सांगितले.

जनतेच्या पैशांची होतेय उधळपट्टी

भोम येथे नवीन 150 क्युबिक क्षमतेची टाकी पूर्ण झाली असून, चांदेलचा 30 एमएलडी प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर नवीन टाकी कार्यान्वित होईल व पुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे असल्याचे अभियंता ठाकूर यांनी सांगितले. पूर्वीच्या 200 क्युबिक क्षमतेपेक्षा जादा क्षमतेची टाकी बांधणे योग्य होते. मात्र नियोजनशून्य कारभारामुळे जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT