Mumbai Goa: गाडी चालवणाऱ्या मुलाचा डोळा लागला अन् आजीसह नातवांनी जीव गमावला, मुंबई- गोवा महामार्गावर तीन ठार

या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये दोन लहान नातवांसह आजीचा समावेश आहे.
Mumbai Goa Highway Accident
Mumbai Goa Highway AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती अपघातांचे सत्र सुरूच आहे. बोरीवली येथून देवगडला कोकणात जाणाऱ्या मुंबईच्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला आहे.

या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये दोन लहान नातवांसह आजीचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिवान दर्शन तावडे (वय वर्षे 03), रित्या दर्शन तावडे ( वय 06 महिने) आणि वैशाली विजय तावडे (वय वर्ष 72) अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. तर, दर्शन तावडे आणि श्वेता तावडे हे दोघे जखमी झाले आहेत.

माणगाव तालुक्यातील कशेणे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वाडा येथील रहिवाशी असणारे हे कुटुंब मुंबईतील बोरीवली येथे राहतात.

Mumbai Goa Highway Accident
गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, सहा दिवसांसाठी मिळेल हिमाचल राज्यात जाण्याची संधी
Mumbai Goa Highway Accident
Mumbai Goa Highway AccidentDainik Gomantak

अपघात झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने तात्काळ मदतकार्य सुरू केले. अपघातातील जखमी दर्शन तावडे आणि श्वेता तावडे यांच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना तातडीने मुंबई येथे केईएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघात एवढा भीषण होता की, कार आणि ट्रकच्या धडकेत मारुती इस्टीलोच्या पुढील भागाचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

दर्शनविरोधात गुन्हा दाखल

कारमध्ये दर्शन तावडे, त्याची आई वैशाली हे पुढच्या सीटवर होते. वैशाली यांच्यासोबत तीन वर्षांचा नातू बसला होता. तर दर्शन यांची पत्नी श्वेता या बाळासह मागच्या सीटवर बसल्या होत्या. दर्शन यांचा कार चालवताना डोळा लागला असावा आणि हा अपघात घडला, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. बेजजाबदारपणे वाहन चालवणे तसंच मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दर्शन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com