Goa Crime News : जिला मुलीसारखं वागवलं, तीच चोर निघाली; साळगावात दागिने चोरणाऱ्या तरुणीला अटक

न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली
Saligao Police Arrested women
Saligao Police Arrested womenDainik Gomantak
Published on
Updated on

साल्मोना वाडो, साळगाव येथे एका घरातील 2 लाख 90 हजार किमतीचे दागिने चोरी केल्याप्रकरणी साळगाव पोलिसांनी संशयित प्राजक्ता खवणेकर (22, कुडाळ, महाराष्ट्र) या युवतीस शुक्रवारी (ता.७) अटक केली.

तिला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिसांनी संशयित युवतीकडून चोरीचे ३७ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केले.

Saligao Police Arrested women
G20 Summit In Goa : ‘एसएआय20’ बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘कॅग’चे प्रतिनिधी मंडळ गोव्यात दाखल

साळगाव पोलिसांच्या माहितीनुसार, हा चोरीचा प्रकार सोमवार, ३ एप्रिल रोजी रात्री १० ते ४ एप्रिल रोजी सकाळी ११ वा.दरम्यान घडला. तर गुरुवार, ६ रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. फिर्यादी निशिता नाईक यांना घरातील कपाटातील मंगळसूत्र, दोन लॉकेट असलेली सोनसाखळी, दोन जोड्या कर्णफुले, पाटली, ५ बांगड्या, नथ व दोन अंगठ्या मिळून २ लाख ९० हजार रुपये किमतीचे दागिने चोरीस गेल्याचे आढळून आले. फिर्यादींनी याप्रकरणी वरील युवतीवर संशय व्यक्त केला होता.

संशयित युवतीस पोलिस साहाय्यक उपनिरीक्षक सूर्यकांत कोलवाळकर, हेड कॉन्स्टेबल तारक कुंडईकर, कॉन्स्टेबल रुद्रेश नाईक व विशांत मयेकर यांनी शोध घेत ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित युवतीविरुद्ध भादंसंच्या ३८० कलमान्वये गुन्हा नोंद असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक उपनिरीक्षक सूर्यकांत कोलवाळकर करीत आहेत.

Saligao Police Arrested women
Vastu Tips: बेडरूममध्ये झोप येत नेसेल तर लगेच 'या' 5 वस्तू बाहेर काढा

युवती ओळखीचीच

फिर्यादीच्या घरी ती संशयित युवती आली होती. संशयित तिच्या कुटुंबीयांसह पूर्वी नाईक यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहात होती. त्यामुळे फिर्यादी कुटुंबीयांसोबत तिची ओळख होती. तिला त्या दिवशी घरी या कुटुंबाने आसरा दिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ती निघून गेली होती.

स्वार्थापोटी विश्‍वासघात

संशयित युवती ही सध्या तिच्या घरी कुडाळला राहायची. मात्र अधूनमधून तिचे साळगावात फिर्यादी नाईक यांच्या घरी येणे-जाणे असायचे. नाईक या त्या युवतीला आपल्या मुलीप्रमाणे वागवत असत. मात्र, स्वार्थापोटी संशयित युवतीने ही दागिन्यांची चोरी करून नाईक यांचा विश्‍वासघात केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com