Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Ponda: 'फोंड्याच्या सर्व समस्या दूर करण्यास आम्ही कटिबद्ध'! CM सावंतांचे आश्वासन; ‘सरकार तुमच्या दारी’चा दीड हजार लोकांना लाभ

CM Pramod Sawant: स्थळ फोंड्याचे राजीव गांधी कला मंदिर, कार्यक्रम ‘सरकार तुमच्या दारी’. या उपक्रमाला आज मिळालेल्‍या उत्स्फूर्त प्रतिसादाने स्मरणीय ठरला.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: स्थळ फोंड्याचे राजीव गांधी कला मंदिर, कार्यक्रम ‘सरकार तुमच्या दारी’. या उपक्रमाला मिळालेल्‍या उत्स्फूर्त प्रतिसादाने स्मरणीय ठरला. दिवसभरात दीडेक हजार लोकांनी आपली सरकारी कामे यात करून घेतली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत एरव्ही साखळी येथील रवींद्र भवनात जनतेच्या समस्या ऐकतात, त्या सोडवतात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री फोंड्यात आले आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर त्यांनी भर दिला. काम करणारा नेता, अशी मुख्यमंत्र्यांची छबी किती दमदार आहे, याची प्रचीती सर्वांनाच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आली.

विविध खात्यांचे स्टॉल्स मांडण्यात आले होते. भू महसूल, मामलेदार, नोंदणी, सहकार, शिक्षण आदी खात्यातील कामे जनतेला तेथल्या तेथे करून मिळत होती.

दिवसभर नागरिकांच्या वर्दळीमुळे परिसर जीवंत झाला होता. ‘सरकार तुमच्या दारी’ म्हणजे खात्रीशीरपणे काही वेळातच काम होणे, हा अनुभव आलेला प्रत्येकजण अनुभवत होता.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की जाहिरात देऊनही फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात न्युरोसर्जन म्हणून कुणी यायला तयार नाही. त्यामुळे न्युरोसर्जन पदावर जर कुणी यायला तयार असेल तर सांगा. न्युरोसर्जनची नियुक्ती करण्याबरोबरच ‘सिटी स्कॅन’चीही व्यवस्था करू, अशी ग्वाही देताना फोंड्याच्या सर्व समस्या दूर करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.

फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिरात ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसमवेत सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, फोंडा नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, राजीव कला मंदिरचे अध्यक्ष रितेश नाईक, इतर नगरसेवक तसेच सरपंच उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, जनतेच्या अनेक समस्या आहेत. त्या रखडू नयेत, यासाठी ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. आता राज्यातील बाराही तालुक्यांत अशा प्रकारचे उपक्रम होतील. सरकारने कौशल्याधारित शिक्षणावर भर दिला आहे.

कुशल युवक हा उद्याच्या समृद्ध देशाचा आधार आहे. दिवंगत आमदार रवी नाईक यांच्या स्मृती जागृत करताना फोंडा समृद्ध करण्याचे त्यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. स्वागत व प्रास्ताविक वीजमंत्री ढवळीकर यांनी केले. लोकांची कामे झटपट होण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्‍यकता असून मुख्यमंत्र्यांनी चांगला उपक्रम आखला आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ढवळीकर यांनी यावेळी केले.

सहकारमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमाप्रमाणे विकासकामे आणि समस्यांचा आढावा प्रत्येक मतदारसंघात दर महिन्याला घ्यायला हवा. सरकारने खूप चांगले उपक्रम आखले असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सोलर पॉवरचे बेतोड्यात उद््घाटन

बेतोडा - फोंडा रस्त्यावरील ॲग्री बाजार प्रकल्पातील सोलर पॉवरचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. राजीव कला मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचीही उपस्थिती होती. ॲग्री बाजार प्रकल्पात विजेची चांगली सोय व्हावी, यासाठी १५६ केडब्ल्यूसी क्षमतेचा सोलर प्रकल्प उभारण्यात आला आहे.

स्वच्छतेवर पाचशे कोटी खर्च; पण...

मुख्यमंत्री म्हणाले, की सरकार जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याबरोबरच आरोग्याचीही काळजी घेण्यास कटिबद्ध आहे. आरोग्य सुदृढ राहायचे असेल तर आधी स्वच्छता हवी. स्वच्छतेवरच सरकार वर्षाला पाचशे कोटी रुपये खर्च करते. तरीही लोक कचऱ्याची समस्या निर्माण करतात. म्हणून स्वच्छता ही महत्त्वाची आहे, याचे भान ठेवा.

केतन भाटीकरांचे प्रश्‍न...!

‘रायझिंग फोंडा’चे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे काही समस्या मांडल्या. भाटीकर यांच्या प्रश्‍नांना मुख्यमंत्र्यांनीही उत्तरही दिले. त्यात फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळाची सध्याची दयनीय स्थिती, राजीव कला मंदिरावर महिला प्रतिनिधीची नियुक्ती करण्याबरोबरच कला क्षेत्रातील लोकांची संचालक मंडळावर वर्णी लागावी. रेती माफियांना आवरा, असे सांगताना खांडेपार येथून रात्री बेकायदा रेती वाहतूक होत असून ती बंद करा. अन्यथा ती वाहतूक आम्ही बंद पाडू, असा इशाराही भाटीकर यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT