Ponda Fort: शंभूराजांच्या शौर्याची देतो साक्ष, गोव्यातील स्वराज्य रक्षक 'फोंडा किल्ला'; 600 मावळ्यांनी पोर्तुगीजांना कसं रोखलं?

Manish Jadhav

शिवकालीन इतिहास

फोंडा किल्ला हा मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे. 1675 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून स्वराज्यात सामील केला होता.

Ponda Fort | Dainik Gomantak

मर्दनगड म्हणून ओळख

या किल्ल्याला 'मर्दनगड' या नावानेही ओळखले जाते. गोव्यातील पोर्तुगीज सत्तेला शह देण्यासाठी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करुन तो अधिक मजबूत केला होता.

Ponda Fort | Dainik Gomantak

संभाजी महाराजांचा पराक्रम

1683 मध्ये जेव्हा पोर्तुगीज व्हॉइसरॉयने या किल्ल्याला वेढा घातला होता, तेव्हा अवघ्या 600 मावळ्यांनी मोठी झुंज दिली. अखेर छत्रपती संभाजी महाराज स्वतः मदतीला धावून आले आणि त्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केला.

Ponda Fort | Dainik Gomantak

पोर्तुगीज-मराठा संघर्ष

या किल्ल्याच्या ताव्यावरुन पोर्तुगीज आणि मराठ्यांमध्ये अनेक वेळा युद्धे झाली. हा किल्ला गोव्याच्या अंतर्गत भागात मराठ्यांचे प्रमुख सत्ताकेंद्र होता.

Ponda Fort | Dainik Gomantak

मराठा वास्तुशैलीचे अवशेष

किल्ल्याची तटबंदी आणि प्रवेशद्वार जरी सध्या पडझड झालेल्या अवस्थेत असले, तरी आजही तिथे मराठा स्थापत्यशैलीच्या खुणा पाहायला मिळतात.

Ponda Fort | Dainik Gomantak

किल्ल्यातील मुख्य आकर्षण

किल्ल्याच्या परिसरात एक पाण्याचे टाके आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला आहे, जो शिवप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.

Ponda Fort | Dainik Gomantak

पर्यटन आणि संवर्धन

सध्या गोवा सरकारने या किल्ल्याचे नूतनीकरण केले असून, तिथे सुंदर बाग आणि माहिती फलक लावले आहेत. इतिहास प्रेमींसाठी फोंडा येथील हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ बनले आहे.

Ponda Fort | Dainik Gomantak

Goa History: गोव्यातील महिलांना सोन्याचं इतकं वेड का? सुवर्ण अलंकारांचा जागतिक तोरा!

आणखी बघा