Vijay Sardesai
Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

दिल्लीतील काँग्रेस प्रमुखांशी झालेल्या बैठकीनंतर सरदेसाई गोव्यात दाखल

दैनिक गोमन्तक

दाबोळी: गोवा फॉरवर्ड पक्षाचे (Goa Forward Party) दिल्लीतील काँग्रेस प्रमुखांशी यशस्वी बैठकीनंतर गोवा फॉरवर्ड पक्षाचे सुप्रीमो विजय सरदेसाई (Vijay Sardesai) गोव्यात दाबोळी विमानतळावर दाखल झाले. येत्या विधानसभेसाठी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाची युती जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत विजय सरदेसाई यांनी काल युतीची घोषणा केली. यावेळी गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) आमदार विनोद पालयेकर, प्रसाद गावकर उपस्थित होते. दरम्यान आज गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांचे गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांना गोव्यात पुढचे सरकार आघाडीतील भागीदारांकडून स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले. ते बुधवारी सायंकाळी दिल्लीहून परतल्यानंतर दाबोलीम विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधत आमदार प्रसाद गावकर यांच्या उपस्थितीत बोलत होते.

विजय यांनी पत्रकारांना सांगितले की, गोवा फॉरवर्ड पक्षाने आणि काँग्रेसने राज्यात युती करण्याचा निर्णय घेतला आहे, तथापि जागावाटपाचा निर्णय नंतर घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.काँग्रेस नेत्यांची दिल्लीतील बैठक होती आणि त्यातून गोव्याचे भविष्य चांगले होईल, असा खुलासाही त्यांनी केला आहे. मात्र, दोन पक्षांची युती गोव्याला भ्रष्ट भाजप सरकारपासून मुक्त करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.तसेच गोवा फॉरवर्ड कॉंग्रेसमध्ये आणखी राजकीय पक्ष सामील होतील. भाजपला बाजूला ठेवून गोव्याला बदलाची गरज असल्याचं सांगून आमदार प्रसाद गावकर यांनी म्हटलं.राज्यात पुढील सरकार स्थापन करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.राहुल गांधींसोबत दिल्लीत झालेली बैठक फलदायी ठरल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

Cape News : पिर्ल, केपेत बेकायदा चिरे खाणीवर धाड; खनिजकर्म खात्याची कारवाई

Electrocution At Miramar: वीज अंगावर पडून मिरामार येथे केरळच्या व्यक्तीचा मृत्यू; सुदैवाने पत्नी, मुले बचावली

Covaxin Side Effect: कोविशील्डनंतर Covaxin वादाच्या भोवऱ्यात; अनेक दुष्परिणाम जाणवत असल्याचे अभ्यासातून उघड

SCROLL FOR NEXT