Sara Tendulkar In Goa Dainik Gomantak
गोवा

Sara Tendulkar In Goa: वानखेडेवरील सामन्यानंतर सारा गोव्यात, फोटो शेअर करताच नेटकरी म्हणाले वहिनी...

सारा आणि शुभमन यांच्याबाबत सोशल मिडियावर नेहमीच चर्चा होत असते.

Pramod Yadav

Sara Tendulkar In Goa: भारत आणि श्रीलंका यांच्यात गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना रंगला, यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत विश्वचषक स्पर्धेच्या सेमी फायनमध्ये धडक मारली. भारताकडून या सामन्यात विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर यांनी दमदार कामगिरी केली तर, गोलंदाजीत सिराज आणि शमी यांनी उत्तम कामगिरी केली.

या सामन्याला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकवर्ग उपस्थित होता, तसेच अनेक नामाकिंत चेहरे देखील उपस्थित होते. या सामन्यासाठी सचिन तेंडुलकर यांची लेक साराने देखील हजेरी लावली होती.

भारत आणि श्रीलंका सामन्यात भारताने मोठा विजय मिळवल्यानंतर टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यात प्रामुख्याने फलंदाजीत विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर यांचे तर गोलंदाजीत सिराज आणि शमी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सारा आणि शुभमन यांच्याबाबत सोशल मिडियावर नेहमीच चर्चा होत असते. दोघांवर अनेक मीम्स देखील व्हायरल होतात. दरम्यान, कालच्या सामन्यानंतर सारा गोव्यात आली आहे. साराने गोव्यातून फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर कमेन्ट करण्यास सुरुवात केली आहे.

साराने गोव्यातून नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत, त्याला ~breezy~ असे कॅप्शन साराने दिले आहे.

या फोटोवर विविध कमेन्टस् केल्या असून, त्यात अनेकांनी तिचा 'सारा वहिनी' असा उल्लेख केला आहे.

याशिवाय नेटकऱ्यांनी साराच्या फोटोचे कौतुक देखील केले आहे. तसेच, त्या फोटोजखाली शुभमन गिलचे फोटो देखील शेअर केले आहेत. काहींनी साराला सेमी फायनलच्या सामान्यासाठी हजर राण्याचे आमंत्रण दिले आहे. सध्या साराच्या या फोटोला तुफान लाईक्स आणि शेअर मिळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT