National Games: श्रुंगीला रौप्य, तर संजनाला ब्राँझ; जलतरणात गोव्याला आतापर्यंत सहा पदके

कांपाल येथे श्रुंगीने महिलांच्या २०० मीटर मेडलीत रौप्य, तर संजनाने ५० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत ब्राँझपदक जिंकले.
shrungi And Sanjana
shrungi And SanjanaDainik Gomantak
Published on
Updated on

National Games Goa 2023: श्रुंगी बांदेकर व संजना प्रभुगावकर या आघाडीच्या महिला जलतरणपटूंमुळे शुक्रवारीही ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याची जलतरणात पदक मालिका कायम राहिली. कांपाल येथे श्रुंगीने महिलांच्या २०० मीटर मेडलीत रौप्य, तर संजनाने ५० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत ब्राँझपदक जिंकले.

गोव्याला आता जलतरणात एकूण सहा पदके मिळाली आहेत. त्यापैकी चार पदके संजनाने प्राप्त केली आहेत. तिने दोन रौप्य व तेवढीच ब्राँझपदके पटकावली आहेत. श्रुंगीने प्रत्येकी एक रौप्य व ब्राँझ मिळविले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील श्रुंगीचे हे एकंदरीत तिसरे पदक आहे. गतवर्षी गुजरातमधील ३६व्या स्पर्धेत तिला ब्राँझपदक मिळाले होते.

श्रुंगीचे शानदार जलतरण

या वर्षी हैदराबादमध्ये झालेल्या ७६व्या सीनियर राष्ट्रीय स्पर्धेत श्रुंगीने दोन ब्राँझपदके जिंकली होती. २०० व ४०० मीटर मेडलीत तिला ही पदके मिळाली होती. आता ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत श्रुंगीने ४०० मीटर मेडलीत ब्राँझपदक मिळविले, तर शुक्रवारी २०० मीटर मेडलीत रौप्यपकाची कमाई केली.

श्रुंगीचे रुपेरी यश साजरे करण्यासाठी तिचे कुटुंबीय जलतरण तलावावर उपस्थित होते, त्यामुळे बंगळूरमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या या आंतरराष्ट्रीय जलतरणपटूसाठी पदक खास ठरले. कर्नाटकच्या मानवी वर्मा हिने २ मिनिटे २४.२१ सेकंद वेळेसह स्पर्धा विक्रम नोंदविला, तर श्रुंगीने २ मिनिटे २६.९० सेकंद वेळेसह रौप्यपदक मिळविले.

ब्राँझपदक विजेत्या कर्नाटकच्या हशिका रामचंद्र हिने २ मिनिटे २८.३१ सेकंद वेळ नोंदविली. पात्रता फेरीत शुक्रवारी सकाळी श्रुंगीने २ मिनिटे ३१.९९ सेकंद वेळ नोंदविली होती, संध्याकाळच्या सत्रात तिने कामगिरीत कमालीची सुधारणा करत रौप्यपदक जिंकले.

shrungi And Sanjana
Ferryboat Charges: फेरीबोटीतून दुचाकी, तीन व चारचाकी, कार्गो आणि प्रवासी वाहनांसाठी दर जाहीर

संजनाचा पदक चौकार

दुबईत प्रशिक्षण घेणाऱ्या सोळा वर्षीय संजना प्रभुगावकरने शुक्रवारी पदक चौकार लगावला. महिलांच्या ५० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत तिने ३०.८० सेकंद वेळेसह ब्राँझपदक पटकावले. पात्रता फेरीत तिने ३१.०२ सेकंद वेळ नोंदविली होती, त्यात संध्याकाळच्या मुख्य फेरीत भरपूर सुधारणा करून तिने स्पर्धेतील सलग चौथ्या शर्यतीत पदक जिंकण्याचा पराक्रम साधला.

या शर्यतीत कर्नाटकच्या रिधिमा कुमार हिने ३०.२१ सेकंद वेळेसह सुवर्ण, तर बंगालच्या सौब्रिती मोंडल हिने ३०.५९ सेकंद वेळेसह रौप्यपदक प्राप्त केले. संजना आणखी एका शर्यतीत भाग घेणार असल्याने तिला पदकांचे पंचक साजरे करण्याची संधी असेल.

झेवियरला पदक हुकले

पुरुषांच्या ५० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत गोव्याच्या झेवियर डिसोझा याला पाचवा क्रमांक मिळाल्यामुळे त्याचे पदक हुकले. त्याने २६.९५ सेकंद वेळेसह शर्यत पूर्ण केली. कर्नाटकच्या श्रीहरी नटराज याने २५.७७ सेकंदात सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राच्या रिषभ दास (२६.६६ सेकंद) याला रौप्य, तर सेनादलाच्या पीएस मधू (२६.७३ सेकंद) याला ब्राँझपदक मिळाले.

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत संजना आणि श्रुंगी

- संजना प्रभुगावकर (४ पदके) ः रौप्य ः २०० मीटर फ्रीस्टाईल व १०० मीटर बॅकस्ट्रोक, ब्राँझ ः २०० मीटर बॅकस्ट्रोक व ५० मीटर बॅकस्ट्रोक

- श्रुंगी बांदेकर (२ पदके) ः रौप्य ः २०० मीटर मेडली, ब्राँझ ः ४०० मीटर मेडली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com