Sao Jose De Areal Dainik Gomantak
गोवा

Sao Jose De Areal: रेल्‍वेमुळे शेती नष्‍ट हाेते, जनावरे मरतात; सां जुझे द आरियल ग्रामस्थांचा स्‍थानकाला विरोध

Sao Jose De Areal Railway Station: सां जुझे द आरियल पंचायतीच्‍या कार्यालयात ही ग्रामसभा झाली. प्रस्‍ताव अाणताना सरकारने आधी स्‍थानिक पंचायतीला विश्‍वासात घ्‍यावे, अशीही मागणी करण्‍यात आली.

Sameer Panditrao

मडगाव: सां जुझे द आरियल येथे कोकण रेल्‍वेतर्फे नवीन रेल्‍वे स्‍थानक बांधण्‍याचा जो प्रस्‍ताव पुढे आणला आहे, त्‍याला आरियल येथील स्‍थानिकांनी विरोध केला असून या संदर्भात आज बोलाविलेल्‍या खास ग्रामसभेत स्‍थानिकांनी या प्रकल्‍पाला एकमुखी विरोध केला.

आरियलमध्‍ये आम्‍हाला रेल्‍वे स्‍थानक तर नकोच पण रेल्‍वे यार्ड बांधायचा असेल तरीही आमचा विरोध आहे. एवढेच नव्‍हे तर रेल्‍वे थांबविण्‍याची सोय जरी केली तरी आमचा त्‍याला विरोध आहे, अशी माहिती फ्रेडी त्रावासाे यांनी दिली. आमदार क्रूझ सिल्‍वा म्हणाले, आपण लोकांबरोबर असून लोकांच्‍या भावना काय ते आपण सरकारच्‍या कानी याआधी घातल्‍या आहेत.

आज सां जुझे द आरियल पंचायतीच्‍या कार्यालयात ही ग्रामसभा झाली. असे प्रस्‍ताव अाणताना सरकारने आधी स्‍थानिक पंचायतीला विश्‍वासात घ्‍यावे, अशीही मागणी करण्‍यात आली. सरपंच कार्मिना फर्नांडिस यांनी या रेल्‍वे मार्गामुळे लोकांची शेती नष्‍ट हाेत असून जनावरेही रेल्‍वेखाली सापडून मरतात. त्‍यामुळे आम्‍हाला आमच्‍या भागात रेल्‍वेचा विस्‍तार नको,असे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT