Santosh Cup Football Dainik Gomantak
गोवा

Santosh Cup Football: आणखी एका मोहिमेसाठी गोवा सज्ज; बाणावलीत रंगणार सामने

डेरिक परेरा यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली संघ जाहीर

Kishor Petkar

Santosh Cup Football: संतोष करंडक राष्ट्रीय स्पर्धेतील माजी विजेत्या गोव्याची गतमोसमातील मोहीम निराशाजनक ठरली. यंदा ७७व्या स्पर्धेसाठी अनुभवी डेरिक परेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघ सज्ज झाला असून पात्रता फेरीतील पहिला सामना सोमवारी (ता. 9) होईल.

गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) शनिवारी स्पर्धेच्या पात्रता फेरीतील अ गट मोहिमेसाठी 22 सदस्यीय संघ जाहीर केला. गट साखळीतील सामने दक्षिण गोव्यातील बाणावली येथे खेळले जाणार असून अनुक्रमे छत्तीसगड, गुजरात, जम्मू-काश्मीर व केरळ हे संघ गोव्याचे प्रतिस्पर्धी आहेत.

37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनिमित्त फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम आणि वास्को येथील टिळक मैदान अनुपलब्ध ठरल्याने आता जीएफएला ७७व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील सामने बाणावली येथील गोवा क्रीडा प्राधिकरण मैदानावर खेळवावे लागत आहेत.

गोव्याचा संघ

गोलरक्षक: अंतोनियो डायलन दा सिल्वा, संजील बुगडे, ओझेन सिल्वा.

बचावपटू: साईश बागकर, ज्योएल कुलासो, जॉयविन कार्नेरो, जोसेफ क्लेमेंत, क्लाईव्ह मिरांडा, दिशांक कुंकळीकर, उमंग गायकवाड.

मध्यरक्षक: विनय हरजी, व्हेलिंग्टन फर्नांडिस, दत्तराज गावकर, ब्रायसन परेरा, नेसियो फर्नांडिस, ज्योबर्न कार्दोझ, सेल्विन मिरांडा, चैतन कोमरपंत, लीवन कास्तान्हा.

आघाडीपटू: लॉईड कार्दोझ, क्लेन्सियो पिंटो, ट्रिजॉय डायस.

अधिकारी: मुख्य प्रशिक्षक: डेरिक परेरा, व्यवस्थापक: संजीव नागवेकर, साहाय्यक प्रशिक्षक: क्लायमॅक्स लॉरेन्स, फिजिओ ः अॅरन रॉड्रिग्ज, गोलरक्षक प्रशिक्षक ः सुगितेश मांद्रेकर, शारीरिक तंदुरुस्ती प्रशिक्षक ः मनीष मलिक.

गोव्याचे वेळापत्रक (सर्व सामने बाणावली येथे)

तारीख 9 ऑक्टोबर: विरुद्ध छत्तीसगड

तारीख 13ऑक्टोबर: विरुद्ध गुजरात

तारीख 15 ऑक्टोबर: विरुद्ध जम्मू-काश्मीर

तारीख 17 ऑक्टोबर: विरुद्ध केरळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Akasa Air चा सावळा गोंधळ, पुण्यात सुरक्षा तपासणी विलंबामुळे सहाजण गोव्यातील शूटिंग चॅम्पियनशिपला मुकले

Goa Tourism: 'गोव्याची बदनामी थांबवूया'! रस्ते, भटकी जनावरे, भिकारी प्रश्नांवर चर्चा; नागवा-हडफडेत पर्यटन हंगामाबाबत बैठक

Goa Live Updates: थिवी रेल्वे स्थानकात 3 लाखांचा गांजा जप्त

Codar IIT Project: 'गावात आयआयटी नकोच'! गावडेंचा कोडारवासीयांना पाठिंबा; विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असल्याची दिली माहिती

Watch Video: 'मोदी माझे गुरु' आरोग्यमंत्री राणेंचा पंतप्रधानांसाठी खास व्हिडिओ, म्हणाले "मी सामान्य कार्यकर्ता"

SCROLL FOR NEXT