Santa Cruz Goa Panchayat member booked Dainik Gomantak
गोवा

St. Cruz: स्वातंत्र्यदिनीच तिरंगा आणि पंतप्रधान मोदींचा अवमान, सांताक्रुझ पंचायत सदस्याविरुद्ध गुन्हा दाखल

पंचायत सदस्याने फेसबुकवरती एक फोटो शेअर केला आहे.

Pramod Yadav

राष्ट्रीय ध्वज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान केल्याबद्दल सांताक्रुझ पंचायतीच्या सदस्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 500 आणि राष्ट्रीय सन्मान कायद्याच्या कलम 2 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सर्वांना सोशल मिडिया हँडलचा डिपी बदलण्याचे आवाहन पंतप्रधान यांच्यासह सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले. त्यावेळी सदस्याने आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नाझारियो डिसूझा असे या पंचायत सदस्याचे नाव असून, त्याने फेसबुकवरती एक फोटो शेअर केला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय ध्वज एकत्र दाखवण्यात आला असून, तो राष्ट्रीय ध्वज आणि पंतप्रधान मोदींचा अपमान असल्याचा आरोप तक्रारदार इनासियो परेरा यांनी फिर्यादीत केलाय.

डिसूझा यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरड्याच्या रूपात दाखवण्यात आले असून, शेजारी तिरंगा आणि त्याखाली जीडीपी असे बॅनर उभारण्यात आलेत. तिरंगा आणि देशाच्या पंतप्रधानांचा हा अवमान असल्याचे परेरा यांनी म्हटलंय.

या फोटोवर परेरा यांनी आक्षेप घेत पोलिसांत धाव घेतली असून, पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.

डिसूझा याने शेअर केलेला फोटो राष्ट्रीय ध्वज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान असल्याचे परेरा यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

14 ऑगस्ट रोजी डिसूझा याने फोटो शेअर केल्यानंतर स्वातंत्र्यदिनीच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; आरोप निश्चित करण्याचे म्हापसा कोर्टाचे आदेश

Oceanman Controversy: ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? 'ओशनमन'वरुन फेरेरांचा सवाल; पर्यटनमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी

Goa Today's News Live: वाळपईत घराला आग; बाईक, वॉशिंग मशीन आणि शेड जळून खाक

Savarde: सावर्डे ग्रामसभी तापली! निधी गैरवापरावरून गदारोळ; तासभर गोंधळ, आरोप-प्रत्यारोपाचे वातावरण

Chain Snatching: चोरट्यांचा धुमाकूळ! वृद्ध महिलेची 2 लाखांची चेन हिसकावली; नावेलीतील तिसरी घटना, परप्रांतीय टोळी असल्याचा संशय

SCROLL FOR NEXT