CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: युवकांनी FIT INDIA साठी एकत्र यावे; साखळी युवा उत्सव उद्‌घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Sanquelim Yuva Utsav 2024: साखळी युवा उत्सव २०२४ चे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. मतदारसंघातील सर्व युवांसाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन मतदारसंघातील युवकांतर्फे करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sanquelim Yuva Utsav 2024 CM Pramod Sawant

साखळी: सर्वांना विविध क्षेत्रांत पुढे आणण्याचा आमचा प्रयत्न असायला हवा. साखळीतील या युवा उत्सवाबरोबर युवकांना आपले भविष्य घडविण्यासाठी कोणते क्षेत्र उपयुक्त ठरणार, यावर विचार व्हावा. फिट इंडिया चळवळीबरोबरच स्किल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया याकडेही युवकांनी लक्ष देताना आपले भविष्य घडविण्यासाठी एकत्रित यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी न्हावेली-साखळी येथे केले.

साखळी युवा उत्सव २०२४ चे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, नगराध्यक्ष सिध्दी प्रभू, कुडणेचे सरपंच बाबला मळीक, पाळीचे सरपंच संतोष नाईक, आमोणाचे सरपंच सागर फडते, न्हावेलीचे सरपंच रोहिदास कानसेकर, वेळगेच्या सरपंचा सपना पार्सेकर, सुर्लच्या सरपंच साहिमा गावडे, हरवळेच्या सरपंच गौरवी नाईक उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून तसेच चषकांचे अनावरण करून या साखळी युवा उत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले.

चार दिवस स्पर्धा

साखळी मतदारसंघातील सर्व युवांसाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन मतदारसंघातील युवकांतर्फे करण्यात आले आहे. २३ व २४ नोव्हें. तसेच २९ व ३० नोव्हें. असे चार दिवस मतदारसंघातील विविध संघांमध्ये क्रीडा स्पर्धा, तसेच सांस्कृतिक स्पर्धा व कार्यक्रम होणार आहे. तर १ डिसें. रोजी साखळी रवींद्र भवनात या सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

मुलाचा घटस्फोट, आईने घातला दुधाने अभिषेक; 'हॅप्पी डिव्होर्स' केक कपणाऱ्या तरुणाचा Video Viral

म्हापसा दरोडा! 30 तास उलटले, हाती धागेदोरे नाहीत; खबर मिळताच तातडीने नाकाबंदी न केल्यानेच दरोडेखोरांचे फावले

Goa Accident: पर्यटक महिलेची बेफिकिरी नडली, दारूच्या नशेत गाडी ठोकून 'ती' फरार; स्कुटरस्वार गंभीर जखमी

Zoho Mail: Gmail, Yahoo विसरा आता देशी ई-मेल वापरा; झोहोवर वैयक्तिक आणि बिझनेस मेल कसा तयार कराल? Step By Step प्रोसेस

SCROLL FOR NEXT