Anupam Kher At IFFI: 'भिगा हुआ आदमी बारिशसे नहीं डरता'; अनुपम खेर अपयशाबद्दल म्हणाले की...

IFFI 2024: माझ्यात वेगळे काही नव्हते. पण माझे एक स्वप्न होते आणि ते पूर्ण करण्‍यासाठी मी कठोर परिश्रम केले. आज मी जो काही आहे, तो याच कठोर परिश्रमामुळे, असे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी सांगितले.
Anupam Kher At IFFI
Anupam KherX
Published on
Updated on

Anupam Kher Master Class At IFFI 2024

प्रत्येक माणसात एक खास गुणवत्ता असते. ती शोधून काढण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे कोणी अपयशाला घाबरू नये, तर त्यातून धडा घेऊन पुढे जावे. माझ्यात वेगळे काही नव्हते. पण माझे एक स्वप्न होते आणि ते पूर्ण करण्‍यासाठी मी कठोर परिश्रम केले. आज मी जो काही आहे, तो याच कठोर परिश्रमामुळे, असे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी सांगितले.

इफ्‍फीनिमित्त कला अकादमीत आयोजित ‘मास्टर क्लास’मध्‍ये अनुपम खेर यांनी आपला संघर्ष आणि यशोगाथा सांगितली. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून सर्वांना आपल्या आयुष्यातील अडचणींना तोंड देण्याची शक्ती मिळाली. त्‍यांनी आपल्या बालपणापासून ते आजपर्यंतच्या प्रवासातल्या विविध टप्प्यांची माहिती दिली. गरिबीतून बाहेर पडून एक यशस्वी अभिनेता कसा बनलो, याची कहाणी सांगितली.

अपयश म्हणजे एक उत्सवच!

अनुपम खेर यांनी अपयशाकडे उत्सव म्हणून पाहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. माझ्या वडिलांनी मला हे शिक्षण दिले. मी लहान असताना मला अपयश आले किंवा असफलता मिळाली की माझे वडील फुलांचा गुच्‍छ देऊन माझ्या प्रयत्नांचे कौतुक करायचे.

भिगा हुआ आदमी बारिशसे नहीं डरता

अनुपम खेर यांनी आजोबांकडून मिळालेल्या प्रेरणेबद्दल सांगितले. ते म्हणाले, मुंबईत चित्रपटात काम मिळविण्यासाठी मी आलो होतो. परंतु कुणीच काम देत नव्हते. ‘तुझ्‍या डोक्यावर केस नसल्याने आम्ही तुला काम देऊ शकत नाही’ असे सांगण्यात येत होते. दीड वर्ष मी मुंबईत काम शोधात होतो. माझ्याजवळचे सर्व पैसे संपले. त्यावेळी मी रेल्वेस्थानकावर झोपत होतो. त्‍यावेळी मी आजोबांना पत्र लिहून मुंबई सोडणार असल्‍याचा विचार सांगितला. तेव्हा मला आजोबांनी ‘भिगा हुआ आदमी बारिशसे नहीं डरता’ असे पत्र लिहून पाठविले. या एका वाक्याने माझे जीवन बदलून गेले.

युवकांसाठी प्रेरणादायी विचार

अनुपम खेर यांनी युवकांना स्‍वत:चे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले. ते म्‍हणाले, जर आपण आपल्या ध्येयाकडे दृढ निश्चयाने वाटचाल केली तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. जीवनाच्‍या प्रवासात आपल्याला अनेक चढउताराचा सामना करावा लागतो. पण आपण जर धीर आणि धैर्य राखले तर कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Yuri Alemao Goa Rakhan Yatra
mission for local protest warning
Tourist Assault
Bicholim Class 11 Admissions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com