Goa urban planning Dainik Gomantak
गोवा

Sanquelim News: साखळीला एज्युकेशन सिटी आणि टेम्पल टाऊन बनवण्यासाठी मुख्यत्र्यांचा 'मास्टर प्लॅन'

Pramod Sawant Goa: साखळी हे शैक्षणिक शहर व टेम्पल टाऊन या नावाने ओळखले जाणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हरवळे साखळी येथे केले

Akshata Chhatre

साखळी: पणजी शहरानंतर संपूर्ण गोव्यात दुसरा मास्टर प्लॅन हा साखळी शहराचा तयार करण्यात आला होता. हा मास्टर प्लॅन चालीस लावण्यास आतापर्यंत अनेक अडचणी आल्या, पण आता साखळीत भाजपचे पालिका मंडळ असल्याने साखळीचा मास्टर प्लॅन येत्या तीन चार वर्षांत पूर्ण होणार, त्यादृष्टीने काम सध्या सुरू आहे. साखळीत शैक्षणिक सुविधा व मंदिरांचे सौंदर्यीकरण पाहता भविष्यात साखळी हे शैक्षणिक शहर व टेम्पल टाऊन या नावाने ओळखले जाणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हरवळे साखळी येथे केले.

एज्युकेशन सिटी आणि टेंम्पल टाऊन

साखळी नगरपालिकेच्या प्रभाग क्र. १ मध्ये नगरपालिकेतर्फे साकारण्यात आलेल्या ओपर एअर व्हेन्यूच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. येणाऱ्या काळात साखळी एक स्वयंपूर्ण शहर बनेल. बालवाडीपासून ते थेट पदव्युत्तर शिक्षणापर्यंत सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

सध्या फिजिओथेरपी, योगिक सायन्स आणि फार्मसी कॉलेजसारखे शैक्षणिक प्रकल्प साखळीत सुरु केले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री आणि साखळीचे आमदार प्रमोद सावंत यांनी केलीये. राधाकृष्ण मंदिरांनंतर आता हरवळ्यातील रुद्रेश्वर मंदिराच्या सौंदर्यीकरण केले जाणार आहे. एका छोट्याशा क्षाराचे रूपांतर लवकरच एज्युकेशन सिटी आणि टेंम्पल टाऊनमध्ये करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेय.

साखळीत उभा राहणार किल्ला

पुरातत्व खात्यातर्फे साखळी बाजारातील ऐतिहासिक किल्ल्याच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नगराध्यक्षा सिध्दी प्रभू, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर व इतरांनी पाहणी केली. हा किल्ला पुरातत्व किल्ला व वस्तुसंग्रहालय म्हणून नावारूपास येणार असून तो येत्या ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या किल्ल्यावर सरकार सुमारे २ कोटी रूपये खर्च करत आहे, असे देखील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT