Sanquelim municipal council  Dainik Gomantak
गोवा

Sanquelim municipal council :विनापरवाना कृतीला थारा नाही; साखळी शहरातील बॅनर्स नगरपालिकेने हटवले

बॅनर्ससाठी चार जागा निश्‍चित ; परिसरातील विद्रुपीकरण रोखले

गोमन्तक डिजिटल टीम

Sanquelim Palika : साखळी नगरपालिका क्षेत्रात विशेषतः शहरी भागात सर्वत्र कोणत्याही रीतसर परवानगीशिवाय लावण्यात आलेले विविध जाहिरातींचे कार्यक्रमांचे बॅनर्स साखळी नगरपालिकेने धडक कारवाई करत हटविले. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून असलेले हे बॅनर्स शहराच्या सौंदर्याला बाधा आणत होते.

त्यामुळे शहराचे स्वरूप ओंगळवाणे वाटत होते. विनापरवाना बॅनर्स लावणे किंवा अशी कृतीला साखळी पालिका परिसरात थारा नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे नगराध्यक्ष रश्‍मी देसाई यांनी सांगितले.

सदर बॅनर्स लावण्यासाठी संबंधितांनी कोणत्याही प्रकारचे रीतसर परवाने साखळी नगरपालिकेकडून घेण्यात आले नव्हते. तसेच काही कार्यक्रम झाल्यानंतरही बॅनर्स तसेच ठेवले होते. काही ठिकाणी हे बॅनर्स लोंबकळत होते.

त्यामुळे या सर्व बॅनर्सवर कारवाई करण्याचा ठराव पालिका बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार नगरपालिकेतर्फे धडक कारवाई करत शहरातील सर्व बॅनर्स हटविण्यात आले. यावेळी पालिका मार्केट निरीक्षक बसप्पा यांची उपस्थिती होती.

स्वच्छ व सुंदर साखळीचा नारा देत पालिका क्षेत्रातील कचऱ्याचा विषय गंभीरपणे हाती घेण्यात आलेला आहे. परंतु या अस्ताव्यस्त बांधण्यात येणाऱ्या बॅनर्समुळे शहराचे सर्वत्र विद्रुपीकरण होत होते. तसेच त्यामुळे नगरपालिकेलाही महसूल मिळत नव्हता. त्यासाठी हे बॅनर्स हटविण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे देसाई यांनी सांगितले.

शुल्कासह परवानगी!

नगरपालिकेने बसस्थानक जंक्शन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडील जंक्शन, सरकारी इस्पितळ जंक्शन व हाऊसिंगबोर्ड जंक्शन अशा चार जागा बॅनर्स लावण्यासाठी निश्चित केल्या आहेत.

केवळ त्याच ठिकाणी ठरावीक शुल्क आकारून बॅनर्स लावण्याची परवानगी नगरपालिका देणार आहे, असे रश्मी देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT