BJP  Gomantak Digital Team
गोवा

BJP in Sanquelim: साखळीत भाजपची वर्षभरातच मुसंडी !

पालिका निवडणुकीत 3365 मते : काँग्रेस पक्षासाठी मात्र धोक्याची घंटा

गोमन्तक डिजिटल टीम

BJP in Sanquelim: 2018 साली झालेल्‍या नगरपालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर तसेच विधानसभा निवडणुकीतही मतांमध्‍ये खूपच मागे राहिलेल्या भाजपने साखळी पालिका क्षेत्रात एका वर्षातच बरीच मुसंडी मारत 12 पैकी 11 उमेदवार निवडून आणलेच, शिवाय 1276 मतांची आघाडीही घेतली.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे साखळी पालिका क्षेत्रात पिछाडीवर राहिले होते.

विरोधी उमेदवार धर्मेश सगलानी यांनी तेथे आघाडी घेतली होती. मात्र अवघ्‍या एका वर्षात भाजपने साखळी पालिका क्षेत्रात चांगली कामगिरी केल्‍याचे दिसून आले.

या पालिका निवडणुकीचा निकाल बराच लक्षवेधी व धक्कादायक ठरला. भाजपला तर या निकालाने सुखद धक्का दिला. सर्व प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांना बरीच आघाडी मिळाली.

केवळ प्रभाग 4 मध्ये 28 व प्रभाग 7 मध्ये 15 अशा अल्पशा मतांच्या आघाडीवर विजय मिळाला. विर्डी गावातील प्रभाग 12 मध्ये सर्वाधिक 217 मतांची आघाडी अंजना कामत यांच्या नावावर नोंद झाली.

तर, प्रभाग 6 मध्ये विनंती पार्सेकर यांना दुसऱ्या क्रमांकाची 210 मतांची आघाडी मिळाली. सर्व दहाही प्रभागांमध्ये भाजपने एकूण 6070 मतांपैकी 3365 मते मिळविली. ‘टुगेदर फॉर साखळी’ला 2089 मते प्राप्‍त झाली.

तर, अन्‍य 11 अपक्ष उमेदवारांना 544 मते मिळाली. 72 मते बाद झाली. भाजपचे निर्विवाद यश मिळवताना यावेळी प्रथमच 1276 मतांची आघाडी मिळविली आहे. या निकालात प्रभाग 1 व प्रभाग 7 मधील ‘टुगेदर फॉर साखळी’चे उमेदवार चक्क तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

पहिल्‍या दिवसापासूनच भाजपची पकड

भाजपला प्रभाग 1 मध्ये 44, प्रभाग 2 मध्ये 180 , 3 मध्ये 96, 4 मध्ये 28 ,6 मध्ये210, 7 मध्ये15 , 9 मध्ये 93,10 मध्ये 196, 11 मध्ये117 व प्रभाग12 मध्ये 217 मते मिळाली. त्‍या जोरावराच भाजपने आपल्या मतांची आघाडी वाढविली. भाजपने पहिल्याच दिवसापासून साखळीत आपली पकड ठेवली होती.

त्यामुळे सर्व प्रभागांमध्ये भाजपला उत्तम यश मिळाले. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने साखळी पालिकाही भाजपकडे गेल्‍यास विकास गतीने होईल याच उद्देशाने लोकांनी साखळीत या पक्षाला प्राधान्य दिल्याचे या निकालातून दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

Pooja Naik: “संबंधितांची नावे उघड करावी, कोणाचीही गय करणार नाही”, पूजा नाईक प्रकरणी मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

SCROLL FOR NEXT