Mapusa Court: म्हापसा न्यायालयाच्या महिला कर्मचाऱ्याला धमकी, कारने केला पाठलाग; कळंगुटच्या दोघांना अटक

एका केसप्रकरणी त्यांना धमकावल्याची माहिती समोर आली आहे.
Mapusa Court
Mapusa CourtDainik Gomantak

म्हापसा न्यायालयाच्या महिला कर्मचाऱ्याला धमकी देणे तसेच, कारने पाठलाग केल्याप्रकरणी कळंगुट येथील दोघांना अटक करण्यात आली आहे.

(Two persons from Calangute arrested by Porvorim police for intimidating a judge and threatening a staff member of mapusa court)

संशयित सायतो लोबो आणि झेवियर लोबो (दोघेही रा. कळंगुट) या दोघांना पर्वरी पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशियत आरोपींनी म्हापसा न्यायालयाच्या महिला कर्मचाऱ्याला धमकी दिली. तसेच, कारने पाठलाग केला. न्यायाधीशांनी तक्रार दिल्यानंतर पर्वरी पोलिसांनी दोघांना अटक केलीय. एका केसप्रकरणी त्यांना धमकावल्याची माहिती समोर आली आहे.

Mapusa Court
Masters In Sanskrit: संस्कृतमध्ये मास्टर व्हा! गोवा विद्यापीठ प्रथमच पदव्युत्तर अभ्यासक्रम

संशियत आरोपींनी महिला कर्मचाऱ्याची म्हापसा ते पर्वरी दरम्यान कारचा पाठलाग केला. त्यानंतर महिलेची कार पर्वरी पोलिस ठाण्याच्या दिशेने वळाल्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com