गेल्या दोन वर्षात कोरोना काळातील निर्बंधामूळे अनेक उत्सव तसेच सार्वत्रिकरित्या एकत्र येण्यास नागरिकांना मर्यादा होत्या. त्यामूळे नागरिकांना कोणत्या ही प्रकारचे सण साजरे करता येत न्हवते. मात्र यंदा राज्यशासनाने घेतलेल्या निर्णयानूसार यंदाचे उत्सव करण्यास मर्यादा न घालता ते साजरे करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामूळे यंदा सर्वत्र गणेशउत्सवांचे नियोजन सार्वजनिक मंडळांनी केले आहे.
(sanquelim Ganesh Utsav Mandals planning various programs this year)
या पार्श्वभूमीवर आज साखळीतील सार्वत्रिक गणेश उत्सव मंडळांनी पत्रकार परिषदेत आपण यंदाचा गणेश उत्सव साजरा करणार असल्याची माहिती दिली आहे. याबाबत बोलताना गणेश उत्सव मंडळानी यंदा विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ही सांगितले. डिचोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
यावेळी आपण देशातील अनेक राज्यातून येणाऱ्या लोकनृत्य पथकांचे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.या पथकांमध्ये सुमारे 70 ते 75 कलाकारांचा सहभाग असणार आहे. ही पथके राजस्थान, महाराष्ट्र ,ओडिसा यांसारख्या राज्यातून येणार आहेत. तसेच कोकणी आणि मराठी भावगीतांचा कार्यक्रमांचे ही नियोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
तसेच जादुचे प्रयोगांचे ही आयोजन करण्यात येणार आहे. तसेच रात्रीच्यावेळी नागरिकांसाठी कोकणी नाट्यप्रयोगाचे ही सादरीकरण होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.