Sankhali Municipal Elections 2023 Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Municipal Elections 2023: साखळी निवडणूकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात; तुल्‍यबळ लढतीची शक्‍यता

मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला ; मतदारांच्या गाठीभेटीवर दिला भर

गोमन्तक डिजिटल टीम

Sanquelim Municipal Elections 2023: साखळी पालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचाराला एकच दिवस उरला आहे. त्यामुळे सकाळपासूनच उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिली. काही उमेदवारांच्या गुप्त बैठकाही सुरू असल्याची माहिती समोर आली.

परंतु येथील मतदारांना काय वाटतेय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र मतदारांमध्ये खरोखरच ‘भिवपाची गरज'' असल्याचेच अनेकजण खासगीत सांगताना दिसले.

विधानसभा निवडणुकीत ज्यापद्धतीने मतदारांना अनुभव आला, त्यापेक्षा जास्तच अनुभव सध्या मतदारांना येत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

यावरून साखळी पालिकेची निवडणूक नक्की कोणत्या दिशेने चालली आहे, हे दिसून येते. प्रभाग क्र. १ असो, बाजारपेठ असो वा अगदी शेवटचा प्रभाग असो,

शहरात निवडणुकीचे वातावरण आहे, असे कुठेच वाटत नाही. भाजपच्या पक्ष कार्यालयासमोर लागलेले झेंडे वगळता इतरत्र कोठेही भाजप उमेदवाराच्या प्रभागात त्याची कोणतीही छबी झळकताना दिसत नाही.

त्यामुळे साखळीतील निवडणूक कोणत्या तरी सावटाखाली लढली जातेय की काय? असेच वाटते.

नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार सुरू दिसतो, दुसऱ्या बाजूला मतदारांच्या गुप्त बैठका घेतल्या जात आहेत. तर काहीजण घरोघर भेटी देण्यावर भर देत आहेत. हा प्रचार शेवटच्या टप्प्यातील असल्याने सर्व काही अत्यंत गुप्ततेत सुरू आहे.

एका मतदाराने सांगितले, ‘भाजपचे उमेदवार अनेक ठिकाणी युवकांचा गट घेऊन प्रचार करतात;

पण तसा विरोधी उमेदवाराचा प्रचार दिसत नाही. कारण विरोधी उमेदवाराबरोबर जो कोणी दिसेल, त्याला थेट काही वेळात फोन येतो, पण त्या फोनवर काय सांगितले जाते ते त्यांनाच माहीत.

कारण त्यानंतर तो त्या उमेदवाराबरोबर दिसण्याचे धाडसच करीत नाही, अशा अनुभवातून तुम्हाला काय दिसतेय ते पहा.‘

विधानसभा निवडणुकीत अगदी कमी मतदानाच्या फरकाने निवडणूक जिंकलेल्या प्रमोद सावंत यांच्यासाठीही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT