Accident Death Dainik Gomantak
गोवा

Accident Death: सांकवाळमध्ये भीषण अपघात; दुचाकी फरफटत नेली, मर्सिडीजही जळून खाक, एक ठार

Goa Road Accident Death: भरधाव मर्सिडीजच्या पुढील भागाला दुचाकी अडकल्याचेही भान नसल्याने चालकाने कार थांबवली नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: भरधाव मर्सिडीजच्या पुढील भागाला दुचाकी अडकल्याचेही भान नसल्याने चालकाने कार थांबवली नाही. तब्बल एक किलोमीटरपर्यंत दुचाकी फरफटत नेल्यानंतर घर्षणातून कारला आग लागली. या भीषण अपघातात सांकवाळ-शिंदोळी येथील अशोक चव्हाण (३७) यांचा मृत्यू झाला. फातोर्डा येथील विद्याधर प्रभू (३२) असे मर्सिडीज चालकाचे नाव असून, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचा प्राथमिक संशय आहे.

दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या अशोक चव्हाण यांना रुग्णवाहिकेतून इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने कारला लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली होती.

वाहतुकीवरही परिणाम

अपघाताच्या वेळी परिसरातील शाळा सुटली होती. कारला लागलेली आग आणि घटनास्थळी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ बंद झाली. आग लागलेली कार आणखी पुढे गेली असती तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती.

कारचालक मद्यधुंद

शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास उपासनगर येथून उताराच्या रस्त्याने मर्सिडीज भरधाव वेगाने अशोक चव्हाण यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेच्या जोरात चव्हाण रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात फेकले गेले. मात्र, कारचालकाने कार थांबवण्याऐवजी ती तशीच पुढे नेली.

धडकेनंतर दुचाकी कारच्या पुढील भागात अडकली होती. मात्र, चालकाला त्याची कल्पनाच आली नाही. कार पुढे जात राहिली आणि दुचाकी तब्बल एक किलोमीटरपर्यंत फरफटत गेली. कार आणि दुचाकीच्या सततच्या घर्षणामुळे ठिणग्या उडून कारच्या पुढील भागाला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT