Sankhalim News Dainik Gomantak
गोवा

Sankhalim News: देसाईनगर साखळीत वीजवाहिनीचे काम पाडले बंद; नगरसेवक संतप्त

वारंवार जलवाहिनी फुटत असल्याने लोकांमध्ये नाराजी

दैनिक गोमंतक

Sankhalim News: देसाईनगर साखळी येथे भूमिगत वीजवाहिनीचे काम करत असताना वारंवार फुटत असलेल्या जलवाहिनीमुळे लोकांचे पाण्याविना हाल होत आहेत. या प्रकारावर स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

संतप्त नगरसेवक प्रवीण ब्लेगन यांनी भूमिगत वीज वाहिनीचे काम बंद पाडले. खोदलेले रस्ते पूर्वपदावर आणण्यास कंत्राटदारास भाग पाडत रस्त्याच्या बाजूला लावलेले ड्रिलींग मशीन व टँकर हटविण्यास सांगितले.

या कामासंदर्भात योग्य दिशा ठरविण्यासाठी नगरपालिका मुख्याधिकारी, नगराध्यक्षा, वीज खात्याचे अधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा करा.

या कामात जलवाहिन्या फुटणार नाहीत, याची काळजी घेऊ, अशी हमी द्या व नंतरच काम सुरू करा, असा कडक पवित्रा नगरसेवक ब्लेगन यांनी घेतला आहे.

साखळीतील देसाईनगर व इतर भागांमध्ये सध्या या भूमिगत वीजवाहिनीचे काम जोरदारपणे सुरू आहे. या कामामुळे जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार सुरूच आहेत. देसाईनगर भागात आतापर्यंत पाचवेळा या कामामुळे जलवाहिनी फुटून लोकांचे हाल झाले.

तसेच लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. गुरूवारी २२ रोजी पुन्हा जलवाहिनी फुटली. त्यामुळे भागातील पाणीपुरवठा बंद झाला होता.

१ जानेवारीपर्यंत काम बंद ची सूचना
वारंवार जलवाहिनी फुटत असल्याने देसाईनगर भागातील काम येणाऱ्या १ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याची सूचना नगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे,असे नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी सांगितले. या प्रकारासंदर्भात वीज अभियंत्यांशी आपण चर्चा केली होती.

आता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक घेऊन काम सुरू करण्यात येणार आहे. तोपर्यंत देसाईनगर भागातील काम बंद राहिल, असे देसाई यांनी सांगितले.

भूमिगत वीजवाहिनीची आजच गरज नाही. हे काम करताना पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी तसेच संबंधित यंत्रणा बरोबर घेऊनच काम करावे.

जलवाहिनी फुटल्यास ती लगेच दुरूस्त करून लोकांना पाणी पुरवठा सुरळीत करून देण्याची जबाबदारी घ्या. किंबहुना जलवाहिनी फुटणारच नाही, याची काळजी घ्या. कामाचे योग्य नियोजन करा.
- प्रवीण ब्लेगन, नगरसेवक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दुसऱ्या महायुद्धामुळे व्यथित झालेल्या महात्मा गांधींनी हुकूमशहा हिटलरला लिहली होती दोन पत्रं; काय लिहलं होतं पत्रात? वाचा

Battle of Longewala: 1971 चा रणसंग्राम; एका रात्रीत पाकिस्तानच्या 36 रणगाड्यांचा खात्मा! काय आहे 'लोंगेवाला युद्धा'ची कहाणी?

Goa Cyber Crime: मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवून 1.52 कोटींचा गंडा, सायबर फसवणूक प्रकरणी मुंबईतून एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई!

IND vs WI 2nd Test: 38 वर्षांपासून एकही पराभव नाही, 'दिल्ली'चं मैदान टीम इंडियासाठी लकी; जाणून घ्या काय सांगते आकडेवारी?

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

SCROLL FOR NEXT